Wednesday, July 2, 2025
Homeसंस्कृतीआईपणाचं आव्हान

आईपणाचं आव्हान

गुड्डी च्या आईला सहज म्हणून विचारले,
“कसे सुरू आहे गुड्डीचे ?”
या प्रश्नांची जणू त्या उत्तर तयार ठेवून अगदी पाठांतर केल्या सारखे बोलू लागल्या….
“काही विचारू नका, हल्लीच्या मुली, कोणाचेही ऐकत नाही, उलट उत्तर देतात, ओरडून तर नेहमीच बोलतात. काम सांगितले तर ऐकूण न ऐकल्या सारखे करतात, मोबाइलला तासनतास चिटकून बसतात, खाण्याचे नखरे तर विचारू नका, बाहेरचे सटर-फटर पदार्थ खायला हवे, सतत बोअर होते, मैत्रीणींचे आईबाबा किती चांगले, पाहुण्यांकडे कानाडोळा करणे, काही ना काही गोष्टींवरून चिडचिड करणे, अभ्यास नको असतो, घुम्या सारखे राहणे अजून काय काय सांगू….”.

मला हसू आले, परंतु ही सगळी लक्षणं तुमच्या किशोरवयीन मुलीत जर असतील तर हे सगळे अगदी म्हणजे अगदी ते नॉर्मल आहेत म्हणून बिनधास्त व्हा !! काळजी करु नका !
या वयातील मुलांचे हे वागणे म्हणजेच ते नॉर्मल असण्याची खूणगाठ म्हणावी !

या वयात मुलीला स्वतःच्या दिसण्या, राहण्यावर खूप वेळ देणे आवडते. कुठले कपडे छान वाटतात, कुठली स्टाईल माझ्यावर चांगली वाटते, कुठला रंग खुलून दिसतो, चप्पल की शूज ? स्वतःची इमेज सांभाळणे तिला खूप महत्त्वाचे वाटते. परफेक्ट असणे, राहणे त्यांना खूप आवडते. खरे तर स्वतःची ओळख तयार करणे, आयडेंटिटी बिल्डिंग चा हा काळ असतो. मोठं झाल्याची जाणीव त्यांच्या कृतीतून त्या दाखवण्याचा प्रयत्न करत राहतात.

आईसाठी तिची मुलगी ही नेहमीच लहान असते व तिला प्रत्येक बाबतीत सूचना देणे, सावध करणे हे नेहमीच सुरू असते. परंतु या टप्प्यावर मुलींना हे नकोसं प्रवचन/भाषणबाजी वाटते. आणि त्या सोयीस्कर पणे त्या कडे कानाडोळा करू लागतात.

हल्ली बरेच सकारात्मक बदल दिसून येतात, जसे आईवडील आणि मुलांच्यात एक मोकळा संवाद बऱ्याच ठिकाणी ऐकायला, बघायला मिळतो. मुलींना समजून घेणे, तिला वेळ देणे किती महत्त्वाचे आहे हे आजच्या पालकांना समजले आहे, उगाच विरोध करून भांडण ओढवून परिस्थिती खराब करून घेणे चुकीचे ठरते. त्या पेक्षा बोलून, विचार करून त्यातून एक मध्य काढून पुढे जाण्यात समजदारी ठरते.

मुलींना या वयात सेक्स विषयी बरेच प्रश्न मनात असतात. या विषयी त्यांना योग्य वैज्ञानिक माहिती चे व्हिडिओ, पुस्तके दाखवून समजून सांगितल्यास योग्य प्रकारची माहिती मुलींना मिळते. उगाच इतर मार्गाने मग त्या माहिती गोळा करीत नाही व भलतीकडेच भरकटत नाहीत.

कुमारवयीन काळ हे मुलींसाठी भरकटणारे वय जरी असले तरी या वयात मुलींवर आपला विश्वास दाखवणे, खूप गरजेचे असते. त्यामुळे मुलींच्यात आपल्या विषयी एक वेगळा आदर दिसून येतो. तसेही, मुलींसाठी आपली आई ही एक रोल मॉडेल असते, कूल असते. मित्रत्वाच्या या वागण्यामुळे एक आईमुलीच्या नात्यात अजून एक जवळीक निर्माण होते.

आजच्या लाईफ स्टाईल मध्ये थोडा चौकटी बाहेर जाऊन विचार करणे महत्त्वाचे आहे. हल्ली जगात खूप बदल होताना दिसून येत आहेत, त्या बदलांसोबत आपल्या मुलांना बरोबर घेऊन चालणे खूप वेगळी कसरत म्हणता येईल. परंतु हल्लीच्या नवीन गोष्टींमध्ये आपला रस निर्माण करून, मुलामुलींशी आनंदाने संवाद साधून, थोडे त्यांचे आपण ऐकले तर ते ही आपले ऐकतील ही गोष्ट मनात ठेवून मैत्री च्या नात्याने मोकळा संवाद साधला तर सगळी कडे नक्कीच आनंदीआनंद गडे राहील.

सीमा खंडाळे

– लेखन : सीमा खंडाळे
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४