जगभरात गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या कोरोनाला रोखण्याचा प्रभावी उपाय म्हणजे स्वतःचे लसीकरण करून घेणे हा होय.
लसीकरणाचे महत्त्व ओळखून भारताने एकशे बावीस कोटी नागरिकांचे लसीकरण करून जगात आघाडी घेतली आहे. एकीकडे लसीकरण वेगाने होत असताना दुसरीकडे सरकार कोरोना मुक्ती व निर्बंध मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकत आहे.
सध्या कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना विमान, रेल्वे, लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात येत आहे. येत्या काही काळात बस, पेट्रोल, गॅस, रेशन इत्यादी सुविधा मिळण्यासाठी देखील दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक होणार आहे.
आपल्याला जागच्याजागीच, विनासायास कोरोना लसीकरण प्रमाणपत्र मिळण्यासाठी भारत सरकारने नवीन प्रणाली आणली आहे.
या प्रणालीनुसार आपण आपल्या मोबाईलमध्ये “9013151515” हा नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सऍप मध्ये “Certificate” टाइप करून उपरोक्त नंबरवर पाठवा आणि बघा, तुम्हाला कोविड लसीकरण डोसचे प्रमाणपत्र लगेच मिळेल.
हे प्रमाणपत्र डॉऊनलोड करून त्याची कागदी प्रत आपण आपल्या सोबत ठेऊ शकता तसेच, ती आपल्या मोबाईल वर देखील उपलब्ध असेलच.
मग आपण लसीकरणाचे २ डोस घेतले असतील तर,
वेळ कशाला घालवता ? घेऊन टाका लगेच कोरोना लसीकरण प्रमाणपत्र !

– लेखन : अशोक जवकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ 9869484800
