कोरोना मुळे बंद पडलेल्या शाळा आणि बदललेले मुलांचे जीवन या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेची ओढ प्रतीत करणाऱ्या भावना…
बाहेर खेळणे कमी झाले
घरातच समाधान मानले
आता मात्र शाळा हवीहवीशी वाटे
डोळ्यासमोर शाळेच्या आठवणी दाटे
शाळेच्या ग्राउंडवर कधी पळेन असं झालय
नको टीव्ही, नको फोन आता घरी बोर झालंय
मित्रांसोबत डबा खायचा आहे
मागच्या बेंचवर बसुन खुप हसायचं आहे
मिस करतोय आम्ही, सरांचे रागवणे
प्रिन्सिपलच्या अनाऊन्समेंट्स
अन् रांगेत उभे राहणे
फिल्मी हिरो नको आता गणितातील झिरो हवा
मराठीतील छान कविता इंग्रजीतील धडा नवा
व्हर्च्युअल व्हर्च्युअल खुप झाले आता
पर्यावरणाचे धडे प्रत्यक्ष घ्यायचेत आता
चला लागा तयारीला, शाळेत जायचंय आता
सुरक्षित अंतर ठेऊन काळजी घ्या स्वतः
पुस्तकांसोबत बॅगेत सॅनिटायझर टाका
युनिफॉर्म बरोबरच मास्क लावायला विसरू नका
मास्क लावायला
विसरू नका…
– रचना : सौ. सीमा कोळपकर
Khup sundar Kavita ahe.