Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात....

वाचक लिहितात….

नमस्कार, मंडळी.
आपल्या लोकशाही प्रधान देशाच्या दृष्टीने आपले संविधान अतोनात महत्वाचे आहे.
म्हणूनच संविधान सादर करण्यात आल्याचा २६ नोव्हेंबर हा आपण “संविधान दिन” म्हणून साजरा करीत असतो. यानिमित्ताने आपण प्रसिद्ध केलेल्या निवृत्त सनदी अधिकारी श्री इ झेड खोब्रागडे यांनी लिहिलेल्या “संविधानाचे महत्व” या लेखाला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

युनायटेड किंगडममध्ये स्थायिक झालेल्या
सौ लीना फाटक यांची वार्धक्याचा वेध घेणारी कविता अंतर्मुख करून गेली.

या व ईतर लेखनाविषयी प्राप्त झालेल्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
– देवेंद्र भुजबळ. संपादक

आदरणीय खोब्रागडे सरांचा “संविधानाचे महत्त्व” हा लेख अतिशय पारदर्शी, अभ्यासू व सचोटीची प्रचिती देणारा आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाने आत्मचिंतन करून संविधान अंगिकारणे अत्यंत गरजेचे आहे.

नागपूर पासून शाळा काॅलेजात सुरू केलेला उपक्रम सर्व भारतभर पसरविणे ही सर्व राज्यांची प्राथमिकता असली पाहिजे पण दुर्दैवाने व्हेस्टेड इंटरेस्ट मुळे राजकारण्यांना हा जागर नको आहे. त्यांना जाब विचारणारे नको आहेत. त्यामुळे हा जागर करण्यासाठी आपणासारखे जे पारदर्शी काम करू ईच्छित आहेत त्यांची नितांत गरज आहे.

हा लेख प्रकाशित करणारे माझे गुरू आदरणीय भुजबळ सरांनी हा चिंतनिय लेख आम्हा पर्यन्त पोहचवला व आदरणीय खोब्रागडे सरांनी डोळ्यात अंजन घालणारा लेख लिहिलाच नव्हे तर कृतीतून दाखवून दिला आहे. लेख वाचून प्रेरणा मिळाली त्याबद्दल आपल्या दोघांचीही ॠणी आहे. धन्यवाद.🙏.
– सुनीता नाशिककर
निवृत्त पोलीस उपअधीक्षक. मुंबई

“संविधानाचे महत्त्व”
भारतीय संविधानाने भारतीय मानवाचे सर्वव्यापी विकासाचे, आत्मसन्मानाचे विचार केले आहेत. परंतु संविधान राबवणारी यंत्रणा भ्रष्ट आणि जातीवादी आहे. हे वास्तव आहे…
अगदी शाळांमधुनही धार्मिक व अंधश्रद्धा जोपासणारे शिक्षण शिक्षक देताना दिसतात…
शिक्षकांचा दृष्टिकोन हा नेहमीच वैज्ञानिक असला पाहिजे….पण असे शिक्षण प्रशिक्षण शिक्षकांनाच दिले जात नाही…
अभ्यासक्रमातुनही विद्यार्थ्यांवर असे संस्कार करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही….
आज भारतीय समाज खूपच गोंधळात व संभ्रमावस्थेत आहे… काहींना वाटते कोणी देवदूत येईल व आपले सर्व कल्याण करेल …. तर काहींना आपल्या स्वकर्तृत्वावर विश्वास आहे….

खूप छान माहिती व संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्ये समजून सांगितली आहेत…

जो पर्यंत संविधान राबवणारी कार्यपालिका, न्यायपालिका, मिडीया नितीमत्ता जपणार नाही तो पर्यंत संविधान…समजणारे त्याचा गैरफायदा घेतच राहतील आणि संविधान न समजणारे संविधानाने आम्हाला काहीच मिळाले नाही ही या अफवेलाच सत्य माणून संविधान विरोधकांना अंधपणाने साथ देत रहातील….

पण संविधानानेच देशाची एकता व अखंडता टिकून आहे आणि राहील ….हेच त्रिकालाबाधित सत्य आहे आहे…

जय संविधान….जय भारत….
आपणास शत् शत् प्रणाम सर
– श्री. अंकुशराव तानाजी

कविता भारतीय संविधान
आदरणीय भुजबळ सर आणि राजेंद्र वाणी सर
नमस्कार
फार सुंदर कविता
– मदन लाठी

न्यूज स्टोरी टुडे वाचायला सुरवात केल्यापासून मला मासिक आणि न्यूज स्टोरी ह्यातील फरक जाणवतोय. अतिशय आकर्षक पद्धतीने लेख किंवा कवितांचं प्रेझेंटेशन केलं जातं, त्यामुळे वाचायला हुरूप येतो. काही वेळा तर नुसत बघताच हे वाचायलाच हव अशी जाणीव होते.
आईपणाच आव्हान हा सीमा खंडाळे ह्यांनी मुलांचा सर्वतोपरी विचार करून, त्यात समरस होऊन लेख लिहिला आहे. मुलांशी मैत्रीच्या नात्यानं संवाद साधला पाहिजे हे अगदी पटल. आयुर्वेदा बद्दलची सखोल माहिती डॉक्टर स्वाती दगडे ह्यांनी दिली आहे. कुटुंब रंगलंय काव्यात हे श्री बापट ह्यांचे पाच भाग त्यांच्या अनुभवाचा दाखला देणारे आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांचे गुरू संत आकडोजी महाराज ह्यांचा परिचय प्रथमच झाला. अनेक गोष्टींची ह्या माध्यमतून नव्याने ओळख होते आहे. श्री भुजबळ विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धा चालू करताहेत हा एक वेगळाच पैलू आज दृष्टीस पडला आहे. चित्र गीताला फोटोमुळे उठाव आला आहे तर प्रेझेंटेशन मुळे कवितेला सुद्धा सौंदर्य प्राप्त होतय, जास्त खुलून दिसते आहे ती.
मराठी भाषा समृद्ध व्हावी ह्या करिता तुम्ही घेत असलेले कष्ट सार्थकी लागणारच ह्याबद्दल खात्री वाटते.
– सुनंदा पानसे

सुंदर सकारात्मक लेख.
हसण्यासाठी जन्म आपुला.
– अरूणा मुल्हेरकर. अमेरिका

“ओठावरलं गाणं”
अतिशय सुंदर आणि नेमके लिहिले आहे
– सुजाता राऊत

खरंच खूप छान पद्धतीने लेखकाने रसग्रहण
केले आहे. माती व जनावरे यांच्या व्यथा मनाला खूप
भावल्या.
– माधुरी खेडेकर

माझे अत्यंत आवडते गाणे…हे गाणे लागले की माझे आजोळ आठवते…खूप छान परीक्षण
– रामदास खरे

“ओठावरलं गाणं”
भावे सर,
खूप छान ,अप्रतिम रसग्रहण. खूप आवडले. पुढच्या गाण्याची वाट बघत आहोत.
धन्यवाद, सर.
– संध्या देशपांडे

माझ्या वन्स
खुप भावस्पर्शी लेख.
– सौ लीना फाटक. युनायटेड किंगडम

कवी “बी” यांची दखल घ्यावी
कविवर्य बी यांच्याबद्दल वाचून छान वाटले. त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार तर असावेच पण कविता वाचन करणाऱ्यांसाठी बी व्यासपीठ असावे.
– अरविंद व्यं गोखले

– वार्धक्य –
जीवनात असणाऱ्या रोगराई, दारिद्रय, गरिबी, आणि लाजिरवाणे गलितगात्र झालेले म्हातारपण या सर्व अवस्था पाहूनच राजकुमार सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला….

जीवनाचं आणि म्हातारपणाचं वास्तव मांडणारी आपली कविता अंतरंगात पोचते आणि वेदना होतात….

खरंच शेवटी हेच म्हणावं वाटतं आपले शरीर आणि सर्व ज्ञानेंद्रिये कार्यक्षम असतील, शरीरात चालन्या फिरण्याची, विचार करण्याची ताकद आहे तोपर्यंतच परमेश्वराने मानवाला जिवंत ठेवावे…. लाचार आणि परावलंबी जीवन खरंच नको….

मातृतुल्य सौ. फाटक मॅडम यांना वंदन
– अंकुशराव तानाजी

Excellent article and poem, I really love your emotions… especially the eigth stanza of the poem
– SUHAS GOKHALE

कवी “बी” यांची दखल घ्यावी
भगवान बुद्ध पासून, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संत गाडगेबाबा पर्यंत सर्व संत महात्मे सांगून गेले की मानव श्रेष्ठ आहे. मानव धर्म सर्वश्रेष्ठ आहे, मानव कल्याण हेच ईश्वर कल्याण आहे. परंतु माणूस मात्र कर्मकांडात आणि आघोरी प्रथांमध्ये अडकला. मानव मात्र जाती, धर्म, पंथ, गरीब, श्रीमंत शिक्षित, अशिक्षित अशा भेदाभावा मध्ये अडकला आणि मानवच मानवाचे पतन करू लागला आहे. हे भारतीय मानव समाजाचे सर्वात मोठं दुर्दैव आहे….

कवि…बी यांना मानाचा मुजरा
– अंकुशराव तानाजी

रम्य ते बालपण
खरंच खुप छान व मनाला भावते अशी कविता 👌👌सीमा खरंच छान.
अश्याच छान सोप्या शब्दातीत कविता वाचन हेच NewsStoryToday चे खास वैशिष्ट्य आहे. 👌
– मंदा शेटे
Bhari poems seema👏🏻👏🏻✌🏻✌🏻,,,,,,,,mast Ajun liha ✌🏻✌🏻👌🏻👌🏻best of luck 🍫🍫💐💐
– Jayashree Devre
Khup chan kavita ahey seema tai….😇👍🏻👌🏻
– Priyanka Huljute
खुपच सुंदर….👌👌👍
तुझे कविता वाचनाचे व्हिडिओ छान होतील… एकदा करून बघ
– Vivek Gore

छंद
खूपच छान काव्य रचना…

आनंदी आनंद गडे,
इकडे तिकडे चोहीकडे…

या कवितेची आठवण करून दिली…
– अंकुशराव तानाजी

सर अप्रतिम रचना
अशाच असंख्य रचना तुमच्या कडून याव्यात म्हणून देव तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य देवो
– सौ प्रेरणा प्रदीप वाडी

पुराणिक सर,
सुख आणि दुःख हया भावनांची सांगड, खूप सुंदर शब्दांनी तुम्ही लेखात मांडली आहे.
– वर्षा भाबल.

“कसरावत” ची कहाणी
सध्या कसरावत सिव्हिल हॉस्पिटलला कुलूप लागले आहे, हे वाचून आनंद झाला. लेख वाचताना परिस्थिती चे पूर्ण चित्र लेखकाने डोळ्यासमोर उभे केलेले जाणवले !!
– विजय कुलकर्णी

आडकोजी महाराजांना विनम्र 🙏🏻 अभिवादन.
भुजबळसाहेब,
आपले विचार उत्तम, अनुकरणीय…

सुधाकरराव धारवसाहेब,
आपण पूज्य विनोबाजींचे प्रायोपशनावर व नंतरच्या संपूर्ण कार्यवाही बद्दल मुद्देसुद लिहिले आहे. आपले अभिनंदन आणि पूज्य विनोबाजींना भावपूर्ण आदरांजली…।

कसरावतची यशकथा आवडली. डॉ. किरण ठाकूर सरांनी फारच उत्तम रीतीने कथित केली आहे. सामान्यांच्या असामान्य कार्याला समाजाने आणि सर्व माध्यमांनी प्रोत्साहित करण्याची नितांत गरज आहे असे मला वाटते.
डॉ किरणजी आमचे गुरू ! त्यांना नमस्कार सांगावा.
– सुधाकर तोरणे.🌼
निवृत्त माहिती संचालक

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. वाचक लिहितात या सदराखाली आपण सर्व वाचकांनी दिलेल्या वेगवेगळ्या लेखावरील आणि काव्यावरील प्रतिक्रिया यांना आपल्या वेब पोर्टलवर स्थान दिले. आम्हा वाचकांचे विचार प्रसिद्ध करून सन्मानित केले. त्याबद्दल आदरणीय विचारवंत, लेखक व संपादक मा.देवेंद्रजी भुजबळ साहेब यांचे हार्दिक हार्दिक आभार

  2. शाळेची ओड खुपच छान सुंदर सीमा तुझे लेखन अतिशय सुंदर अप्रतिम आहे 👍👍👌👌👌NewsStoryToday नेहमी प्रमाणे उत्तम लेख व कविता वाचन 👌👌👍👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी