एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्याशी जोडण्याचे “स्किलबुक” हे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल अप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे.
नवी दिल्ली येथे ९ डिसेंबर रोजी “स्किलबुक”चे देशार्पण होणार आहे. यानिमित्ताने “स्किलबुक”ची ही ओळख…..
कौशल्य असलेल्या प्रत्येकाला हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी डॉ.किरण झरकर यांनी संशोधन
केलेल्या “स्किलबुक” या आंतरराष्ट्रिय कौशल्य विकास व उद्योजकता उत्पादनाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे, यावरूनच या प्रकल्पाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.
“स्किलबुक”चे संशोधक डॉ. किरण झरकर हे महाराष्ट्र शासनाच्या शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उस्मानाबाद येथे शिल्प निदेशक आहेत. डॉ. झरकर मानद डॉक्टरेट, पेटंट प्रकाशन, डीप प्रमाणपत्र मिळवणारे आयटीआयचे पहिले शिक्षक आहेत.
मेक इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र , स्टार्टअप इंडिया अंतर्गत डीप प्रमाणित स्किलबुक हा भारताचा फेसबुक पेक्षा चारपट मोठा प्रकल्प आहे. यामुळे स्वदेशी मोबाईल अप्लिकेशन, वेब पोर्टल, इलेक्ट्रॉनिक उपकरण व डोंगल होणार उपलब्ध आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ. झरकर यांनी गेल्या चार वर्षापासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकिय प्रणालीवर संशोधन केले आहे.
शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल करणारे “स्किलबुक” हे उपकरण विद्यार्थ्यांना व शेतकर्यांना उपलब्ध करून देण्यासाठी औरंगाबाद येथील, मुळे आण्णा सोशल फाउंडेशनने मदत केल्या मुळे हे आंतरराष्ट्रिय उत्पादन तयार झाले आहे.
डॉ. किरण प्रकाश झरकर यांनी राष्ट्रिय मानवाधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या मार्गदर्शना खाली स्किल बुक या संगणकीय प्रणालीची निर्मिती केली आहे.
“स्किलबुक” हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्याशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाईल अप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमातून ते उपलब्ध होणार आहे. “स्किलबुक” मुळे मुख्यत्वे विद्यार्थी व शेतकरी यांचे एक लाख कौशल्याचे जाळे तयार करण्यात येणार आहे. यात कौशल्य प्रकाशन, प्रशिक्षण, अभ्यासक्रम, प्रमाणपत्र, नोकरी, शिकाऊ उमेदवारी, सेवा व स्टार्टअप या सुविधा सर्वांना मिळणार आहेत.
केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाअंतर्गत
“स्किलबुक” स्मित किरण पब्लिशिंग प्रा लि या कंपनीने
प्रकाशित केले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाच्या वतीने कंपनीस डिप प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. तसेच कंपनीची कौशल्य विकास व उद्योजकता या शिक्षण विभागासाठी पुढील दहा वर्षासाठी निवड केली आहे. स्किल बुक या प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे सुद्धा यापूर्वी दिल्ली येथे प्रकाशन झाले आहे.
स्मितकिरण प्रकाशन संस्थेचा मुळे आण्णा सोशल फाउंडेशन, ब्रांन्डीग कॅटलिस्ट व युनिक आयपीआर
संस्थेसोबत सामंजस्य करार झाला असून मुळे आण्णा सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी लाखो विद्यार्थी या प्रकल्पाशी जोडले जाणार आहेत.
नवी दिल्ली येथे ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या “स्किलबुक” प्रकाशन महासंमेलनासाठी जगन्नाथ पुरी येथील गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्लानंद सरस्वती, राम मंदिर निर्माण न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, पतंजली योग पिठाचे स्वामी रामदेव बाबा, श्री. तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रधानाचार्य डॉ. रामांन्ना दिक्षितुलु, विश्व विख्यात जोग वारकरी शिक्षण संस्थानचे ह.भ.प. मारोतीमहाराज कुर्रेकर, विश्व शांती राजदुत जैन मुनी डॉ. लोकेश स्वामी, कर्नाटकचे चक्रवर्ती दानेश्वर आप्पा महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प. रतनबाबा महाराज,
श्री. गुरुदत्त संस्थान देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर, ह.भ.प. चैतन्य देगलुरकर महाराज, श्री. गुरुदेव दत्तात्रय जाधव महाराज, श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास मथुरेचे राष्ट्रीय धर्मचार्य नामदेव महाराज हरड, कथाकार मदन मोहन महाराज, भागवताचार्य अनुराधा दिदी आदी साधु संत तपस्वी मुनी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मंत्री सर्वश्री पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, नवाब मलिक, जयंत पाटील, उदय सामंत, आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, डॉ. तानाजी सावंत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, रमेश कराड, समाधान आवताडे, मॅगसेसे अवार्ड प्राप्त व पद्मश्री नीलिमा मिश्रा, पद्मश्री डॉ. शरद काळे, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री उज्वल निकम, सुरेश वाडकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रिय मानवाधिकार आयोग सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे व स्वागताध्यक्ष रमेश आण्णा मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्किल बुकच्या संचालिका प्राचार्य डॉ. भारती पाटील, राष्ट्रीय संयोजक रघुवीर राठोड, उज्जैनकर फौंडेशन चे डॉ. शिवचरण उज्जैनकर, ब्रांन्डीग कॅटलिस्ट चे संचालक अभिषेक त्रिवेदी, युनिक आयपीआर च्या संचालिका मधुवंती केळकर काम पहात आहेत.
– देवेंद्र भुजबळ. 9869484800