झुम बाबा झुम बाबा झुमचा जमाना
जो उठतो तो म्हणतो झूमवर भेटू या ना
अगोदर वाटले काय हे फॅड
हुणार कशी काय मिटिंग गॉड
सोसले मग झूमबाबाचे सगळे मॅड
सुटायचं कसं आता याचं हो याड
पण सांगू का मंडळी झूमबाबांची कृपा
साऱ्यांचा उद्योग आता मारतोय गप्पा
ऑफिसला न मारताही खेपा
झूमबाबांच्या संगतीनं झालाय तो सोप्पा
देशोदेशींचे उद्योजक जोडले एका क्षणात
वेळ काळ विचारता पैसे किती वाचतात
झूमबाबा झालाय मित्र साऱ्यांच्या जीवनात
घरबसल्या नातेवाईक कधीही भेटतात
आता झूमबाबशिवाय काडी हालेना
त्याच्या वाचून कुणाला कांही जमेना
आलेला हा नवा पावना कांही जाईना
वाटतोय की नाही वरदान तुम्हीच सांगाना ?
झुम बाबा झुम बाबा झुमचा जमाना
जो उठतो तो म्हणतो झूमवर भेटू या ना
– रचना : सर्जेराव पाटील. ऑस्ट्रेलिया
(कौलवकर – नाशिककर)