Saturday, July 5, 2025
Homeसाहित्यगाव पालाटलो

गाव पालाटलो

गरीब गावात ,
नळ्याची छपरा ,
लाल मातीत ,
सोनार हिरा ॥

चुलीरच्या तव्यार ,
भाकरी नि करी ,
चुलीच्या निखाऱ्यार ,
सुकटा खारी ॥

मालकी हक्कात ,
शेतात राबलो ,
घोंगडेच्या ऊबेत ,
सुखात निजलो ॥

शहरी हव्यासात ,
जमनी ईकल्यान ,
गावाक ईसरत ,
इमान गाठल्यान ॥

नजरेत भारून ,
परप्रांतीय शिरलो ,
निसर्गाक चिरडून ,
धंदेवाईक झालो ॥

कौलारू घरा ,
डोळ्याआड झाली ,
झावळीची दारा ,
सेफ्टीडोअर बनली ॥

मांडवातला लगीन ,
हॉलात करतत ,
पत्रावळीतला जेवान ,
ताटात वाढतत ॥

शहारासून गावाक ,
पावण्यासारखे येतत ,
रेशनचो तांदूळ ,
हाटलासारखो खातत ॥

झाडांच्या गारव्याक ,
कायमची मुकली ,
ए सी हवेक ,
व्यसनी झाली ॥

गावाच्या वैभवात ,
श्रीमंती ईली ,
निर्मळ कोकणात ,
सृष्टी संपली ॥

वर्षा भाबल.

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. अतिशय सुंदर आणि मार्मिक विषय मांडला आहे. कोकणची माणसे साधी भोळी, कधी भरेल त्यांची झोळी .👌

  2. कोकणाचे सुंदर वर्णन, तेहि तिथल्या बोली भाषेत. चित्र डोळ्यांसमोर उभे केले वर्षाताईॅनी. कविता मनाला भावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments