मित्र, मैत्रिणींनो, नमस्कार.
आज आपण आयुर्वेद म्हणजे काय ? अर्थात त्याच्या अंतरंगात जाऊन समजून उमजून त्याचा अंगिकार करणार आहेात.
आयुष: वेद: इति आयुर्वेद:
आयुष्याविषयी असणारा लेख तो आयुर्वेद आणि
स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम्, आतुरस्य विकार प्रशमनम् असे ज्याचे मूळ तत्व आहे तो आयुर्वेद.
म्हणजे बघा हं, स्वस्थ अर्थात निरोगी व्यक्तीचे आरोग्य कसे टिकून राहील ? हे प्रथम पाहिले जाते तो आपला
आयुर्वेद. तदनंतर आतूर/रोगी -रोग्याच्या विकारांचे शमन केले जाते म्हणूनच आयुर्वेद महान आहे.
आहार, विहार, व्यायाम, दिनचर्या, रूतूचर्या इ. गोष्टींवर आपले आरोग्य अवलंबून असते.
आयुर्वेदातील उपचार पध्दती ही अष्टविध परीक्षेवर अवलंबून असते. विविध प्रकारच्या वनस्पती, त्यांपासून बनवलेले -चुर्ण, कल्क, क्वाथ(काढा), गुटी, वटी, अवलेह, आसव, आरिष्टे, स्वरस, फाण्ट…इ. स्वरूपात वापरता येते.
विविध प्राण्याचे दूध, मांसरस, घृत/तूप, तेल इ.
विविध प्रकारचे लेप, स्वेदन, रक्तमोक्षण… इ.
विशेषत: शमन आणि शोधन अशा प्रकारे चिकित्सा केली जाते.
रसायन चिकित्सा हे आयुर्वेदाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. काही रासायनिक औषधींचा उल्लेख देखिल आयुर्वेदात आढळतो. काही विषांचा (साप, कोळी…) औषधी प्रयोगांचा उल्लेख अगदतंत्र या आयुर्वेदाच्या एका अंगामध्ये आढळतो.
चिकित्सेचा विचार करताना आयुर्वेदाचा उल्लेख आठ प्रकारच्या शाखांमध्ये आढळतो. काय, शल्य, शालाक्य, रसायन, वाजीकरण, कौमारभृत्य-प्रसूतीतंत्र, अगदतंत्र, भूतचिकित्सा.
व्याधी क्षमत्वाचा विचार करताना तर आयुर्वेद आपल्याला खूप आपलासा वाटतो. हर तऱ्हेने आपण त्याचा उपयोग करून घेऊन आपली प्रतिकार शक्ती वाढवू शकतो आणि सध्याच्या काळात तर आपल्याला त्याचे महत्व जास्त जाणवत आहे.
पुढील लेखात आपण सविस्तर माहिती बघू या. तो पर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा. 😊

– लेखन : डॉ स्वाती दगडे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800