ऊनपावस झेलून,
अनुभव घितल्यानं,
सोताक ईसरून,
कुटुंबाक सावरल्यान ॥१॥
संकटांक हरवित,
मार्ग शोधल्यान,
काटे वेचित,
स्वर्ग बनवल्यान ॥२॥
आयेची माया,
आज्जीन लावल्यान,
संस्कारानचो पाया,
आज्जीन उभारल्यान ॥३॥
आज्जीचो बटवो,
उपचार करता,
मायेचो ओलावो,
स्पर्शून जाता।॥४॥
थरथरतो हात,
मायेन फिरता,
नातवंडांच्या आंगात,
बळ आणता ॥५॥
गोष्टी ऐकवताना,
ज्ञान दिल्यान,
अंगाई म्हणताना,
कुशीत निजवल्यान ॥६॥
सांज वातीत,
प्रार्थना म्हटल्यान,
देवांच्या स्मरणात,
संस्कार केल्यान ॥७॥
बोटाक धरीत,
चालूक शिकवल्यान,
आज्जीच्या सहवासात,
विद्यापीठ दाखवल्यान ॥८॥
मायेच्या सावलेत,
सुख गावला,
जीर्ण अडगळीत,
जीवन घडला ॥९॥
वार्धक्याच्या अवस्थेत,
तिटकारु नका तिला,
वृद्धाश्रमाच्या तुरूंगात,
डांबू नका आज्जीला ॥१०॥

रचना : सौ.वर्षा महेंद्र भाबल