Wednesday, June 18, 2025

Body Parts

Medical science ची
झालीय खुप प्रगती
नविन body parts ची
सद्ध्या आहे चलती ।।१।।

डोळ्यांतल्या भिंगानी,
अक्षर होईल मोठे
एैकण्याच्या यंत्रानी
कानच होतील छोटे ।।२।।

तोंडातली gap भरतील
नकली सुरेख दांत
चावणं, बोलणं, हंसायला,
नसेल कांही ताप ।।३।।

गुडघ्याला पण मिळेल,
नविन लोखंडी part
Pacemaker नी निदान,
चालेल weak heart ।।४।।

केस झालेत का विरळ ?,
मग घाला की टोप
चेहेऱ्यांवर तर असतोच,
नेहमी, भरपूर make-up ।।५।।

मणक्यांत झालीय का,
de-generation gap ?
“Hip” बोलतय का,
click-ti-clack ? ।।६।।

Replacement करायला,
surgeon घेतील धांव
जिवाला तर असतेच,
नेहमी जगण्याची हांव ।।७।।

Plastic surgery ने,
दिसाल तरूण जवान
नविन Body parts नी मिळेल,
“चांगलं” जगण्याचा chance ।।८।।

होईल bionic body,
पण वाटेल का ती “आपली”?
Mind फक्त असेल स्वत:चं,
का ते पण होईल “slip”? ।।९।।

Mind च जर झालं slip,
तर नाही त्याला नविन part
लोप होता स्मरणशक्ति,
जवळच्यांना मात्र त्रास ।।१०।।

Dementia, Alzheimer च्या,
धास्तीने मन बेजार
करते तरी मनाशी,
सतत positive विचार ।।११।।

“माझं” असं नसतेच कांही,
शिकवते ना आपले तत्वज्ञान
मग कशाला करावी उद्याची काळजी,
enjoy आजचा दिवस छान ।।१२।।

लीना फाटक

– रचना : सौ लीना फाटक, वॉरिंगटन, यु.के.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. प्रथम संपादक देवेंद्रजी यांचे कविता प्रकाशित केल्याबद्दल व इंग्रजी शब्द देवनागरी एैवजी इंग्लिशच ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा नविन उपक्रम खुप छान वाटला.
    सुहास गोखले, श्री दशरथ पाटील व आशा दळवी यांचे सुंदर अभिप्रायासाठी मन:पूर्वक आभार मानतें. तसेच डाॅ घाणेकर व प्रणाली म्हात्रे यांचे पण प्रतिसाद वाचून खुप आनंद झाला. शिवाय मला वैयक्तिक अभिप्राय पाठवले त्यांना सर्वांना धन्यवाद. 🙏🙏🙏

  2. व्वा! सुरेख आणि समयसूचक रचना .,,…मनापासून आवडली.

  3. लीना फाटक ह्यांची *बाॕडी पार्टस* ही काव्य रचना प्रगत वैद्यकीय विज्ञानावरचं छान भाष्य आहे .आणि देवेंद्रजी भुजबळांच्या उत्कृष्ट संपादनानं आणखी रंगत आणलीय.विदेशात राहूनही कवयित्रींनी मराठी भाषेवर प्रेम टिकवून ठेवलंय.काव्यरुपातनं व्यक्त केलंय.त्यांचे कौतुक आणि भुजबळ साहेबांच्या संपादन कौशल्या बद्दल अभिनंदन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments