प्रसिद्ध कवी विराज पाटील यांचा नवीन कोरा करकरीत इंग्रजी कविता संग्रह ‘Rantings Of My Over Thinking Mind’ हा इंग्रजी कविता संग्रह नुकताच वाचकांच्या भेटीला आला आहे.
विराज वनिता विनय पाटील यांच्या विविधांगी सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या या लेखनामधून वाचकांना छान मेजवानी मिळणार आहे.
दडपलेल्या भावनांना बाहेर काढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कागदावर शब्द उमटवणे. या कविता संग्रहात अनुभवातून साकारलेल्या, संमिश्र भावनांनी ओतप्रोत असलेल्या कविता आहेत.
अनेक कवितांमध्ये अनुभवलेला गहरा आघात सुद्धा मांडला आहे. या पुस्तकात बहु-शैलीचे, बहु-विषयावर असलेले अनुभव एका काव्यमय स्वरूपात लिहिलेले आहेत. इंक प्रेस ने हा कविता संग्रह प्रकाशित केला आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800