महाराष्ट्रीतील नामांकित ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना भारतीय पातळीवरील या वर्षीचा “ सर्वाधिक प्रेरणादायी कुलगुरू २०२०“ ( मोस्ट इन्स्पायरींग व्हाइस चान्सलर ) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डिजिटल पद्धतीने पुरस्कार प्रदान होणार आहे.
Click here to read शिक्षक दिन विशेष: COL आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षिका स्वाती वानखेडे
भारतीय स्तरावरील हा पुरस्कार गोल्डन एम अँवार्ड फ़ॉर एक्सलन्स अँड लीडरशीप इन एज्युकेशन संस्थेव्दारे दरवर्षी दिला जातो. उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी , शिक्षक यांना लेखन, प्रभावी व्याख्यानं व प्रत्यक्ष काम याव्दारे प्रेरणा देण्याचं व नवनव्या कल्पना सातत्यानं राबविण्याचं लक्षणीय सकारात्मक कार्य करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
Click here to read“खिसा”ने राज मोरेला डब्लिन,आयर्लँडच्या शिखरावर बसवले
प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी आपल्या ३५ वर्षांच्या प्रदिर्घ उच्च शिक्षण कारकिर्दीत बहु विषयातील नवनव्या अभ्यासक्रमांची आखणी तसेच नव्या विभागांची स्थापना , अकँडमिक स्टाफ़ कॉलेजमध्ये प्राध्यापकांसाठी शेकडो तसेच विद्यार्थी वर्गासाठी दोन हजारांहून अधिक प्रेरक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर दोन हजारांहून अधिक विषयांना स्पर्श करणारे लेख लिहिले आहेत. कुलगुरू या नात्यानं त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नियोजन व विकासात अनेक उपक्रम राबविले आहेत.
महात्मा गांधी मिशनच्या एमजीएम विद्यापीठात कुलगुरू या नात्याने संशोधन प्रकाशन, करिअर कौन्सुलींग मिशन, आर्टीफिशीयल इंटीलीजन्स , फायनान्शियल टेक्नॉलॉजी , एमसीइडीसोबत उद्योजकतापुरक अभ्यासक्रम , सामाजिक शास्त्रातील तसेच कॉमर्समधील नुतन काल सापेक्ष ऑनर्स अभ्यासक्रम , डीजीटल टीचर प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम, कोरोना काळातील जागतिक व भारतीय स्तरावरील १०० ऑनररी इ-प्रोफेसरची योजना, नव्या शैक्षणिक धोरणावर इ-बुक संपादन , ऑकेज़नल रिसर्च इ-पेपर्सचे प्रकाशन , रूरल इमर्शन कार्यक्रमाची आखणी , ग्रामीण परिवर्तन कार्यक्रम , जगप्रसिद्ध वायले प्रकाशनाचे अभ्यासक्रम , जागतिक स्तरावरील अँपल ट्रेनिंग सेंटरची स्थापना व अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सहयोग , महात्मा गांधी ग्लोबल युथ फेस्टीवलचा संकल्प , एक लाख विद्यार्थी वर्गासाठी सायकोमेट्रीक करिअर टेस्टचे ९० % सवलतीत आयोजन अशा प्रेरक उपक्रमांनी योगदान दिले आहे.
Click here to read जयंती विशेष: कर्मवीर भाऊराव पाटील
त्यांच्या या प्रेरणादायी शैक्षणिक नेतृत्वाचा व प्रबोधक वक्तृत्वाचा उचित गौरव या राष्ट्रीय पुरस्काराने झाला आहे. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव क़दम तसेच सर्व प्राचार्य , प्राध्यापक यांच्या सकारात्मक दृष्टीने व पाठबळाने हे कार्य करता आल्याचे प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांनी म्हटले आहे.
Best.. Great work… congratulations…