Friday, December 6, 2024
Homeलेखअँटिक पीस

अँटिक पीस

प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

आम्ही सहकुटुंब नुकतेच न्यूयाॅर्क या शहरात गेलो होतो. अगदी इ.स. पूर्व काळापासूनच्या रोमन संस्कृतीपासून अनेक ऐतिहासिक संदर्भ जसे या शहराला लाभले आहेत, तसेच आधुनिकीकरणाची सौंदर्य आभूषणेही हे शहर आपल्या अंगावर मिरवत असल्याचे जाणवले.

पहिल्या दिवशी, इथल्या “हाॅप ऑन, हाॅप ऑफ” या आलिशान बसमधून शहराचा फेरफटका मारून, त्यातील निवडक ठिकाणं आम्ही पाहिली. जगभरातील पर्यटकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. त्यांच्यासाठी विविध प्रकारची दुकाने सजली होती.

एका म्युझियमजवळचे अँटिक वस्तूंचे दुकान त्यापैकी एक. विविध काळातील लहानमोठ्या आकाराच्या अनेक वस्तु तिथे
आकर्षकपणे मांडून ठेवल्या होत्या. लहान वस्तु काचेच्या कपाटांतून तर मोठ्या उंची शेल्फवर होत्या. दुकानाच्या युनिफॉर्ममध्ये अनेक तरुण मुलं मुली ग्राहकांना आदबीने आपल्या दुकानाविषयी आणि वस्तुंविषयी माहिती देत होते. विकत घेतलेल्या वस्तु सुंदर वेष्टनात पॅक करून थेट काऊंटरला पाठवल्या जात असत. ऑनलाईन पेमेंट झाले की, विकत घेतलेली वस्तु घेऊन हसतखेळत ग्राहक बाहेर पडत.

आपल्याकडेही अँटिक वस्तूंची अशी अनेक दुकानं आहेत. समाजात, आर्थिक परिस्थिती कशीही असो, आवडतील आणि परवडतील अशा वस्तु आणून घराचा दर्शनी हॉल सजवण्याची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना ते दाखवण्याची आवड अनेक जणांत असते. एका दृष्टीने हे योग्यही आहे.

निसर्गसौंदर्य आणि दुर्मीळ वस्तूंचा अशा पध्दतीने संग्रह करावा असं वाटणं चूक नाही. पण आपल्याच कुटुंबातील वृध्दांच्या बाबतीत मात्र अनेक लोकांचा दृष्टीकोन उपेक्षेचा आणि तत्सम भावनांनी भरलेला असतो. अर्थात, समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून याला अनेक कारणे आणि कंगोरे असतात. यावर अनेक चर्चाही झडतात. टाळी एका हाताने वाजत नाही अशा समांतर भूमिकाही मांडल्या जातात.

हे सारे लक्षात घेऊनही काही मुद्दे विचारार्थ ठेवावे असं मनापासून वाटतं. एक सत्य आहे की, आईवडिलांच्या शारीरिक संबंधातूनच मुलांचा जन्म होतो, तात्विक किंवा वैचारिक भूमिकेतून नाही.
मात्र, जगातील जवळपास नव्व्याण्णव टक्के आईवडील हे जन्माला आलेल्या अपत्याला, कुटुंबात किंवा कुटुंबाबाहेर सुरक्षित वातावरणात वाढवतात.
उतारवयात, जेव्हा ते गलितगात्र होऊन आपल्या मुलांकडून असाच आसरा आणि आनंदी सहवासाची अपेक्षा ठेवतात, तेव्हा, वाढत्या वयामुळे त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वात आलेल्या कमकुवतपणाची हेटाळणी करणं हे नैसर्गिक न्याय आणि माणुसकीला सोडून असतं. नविन पिढीने याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
तुम्हाला काय वाटतं ?

सतीश शिरसाट

— लेखन : प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ. पुणे. ह. मु. इंग्लंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !