शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय, पळसप (जि. धाराशिव) व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित एक दिवसीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धहस्त लेखिका, प्रेरक व्याख्यात्या तथा उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर भूषविणार आहेत. यानिमित्ताने समाजातील सर्व स्तरातून अंजली धानोरकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अल्प परिचय
अंजली धानोरकर यांची साहित्यसंपदा खालीलप्रमाणे आहे.
गट्टी फू
(बालकथा संग्रह)
मनतरंग
(ललित लेख संग्रह)
व्यक्तिमत्त्व विकासासाठी सॉफ्ट स्किल्स
(व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भातील पुस्तक)
मला आय. ए. एस. व्हायचंय ( अनुवादित)
द लीडर इन यू (अनुवादित)
याशिवाय,
मनतरंग या पुस्तकातील काहूर या लेखाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या
बी.ए., बी. एससी च्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात २०१२-१३ पासून समावेश.तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सुद्धा २०१७-१८ पासून ‘देहबोली व संवाद कौशल्य ‘ हा धडा पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट.
सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून विविध शासकीय प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना विविध सॉफ्ट स्किल्सच्या विषयांवर प्रशिक्षण.
अनेक शैक्षणिक तथा औद्योगिक संस्थांमधून त्यांनी प्रेरक व्याख्याने दिली आहेत.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
अंजली ताईंना मनःपूर्वक शुभेच्छा 🌺
आदरणीय अंजली ताईंना मनापासून हार्दिक शुभेच्छा!
ताईंच्या वडीलांनी अर्थात जेष्ठ साहित्यिक दादासो उध्दवजी भयवाळ संभाजीनगर यांची माझ्या मुलं जमिनीवरचे तारे बालकिशोर संग्रहाला प्रस्तावना लाभली आहे.
गोविंद पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.
८७८८३३४८८२
अभिनंदन.
मनापासून अभिनंदन, अंजलीताई…!
.. प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007