नमस्कार मंडळी.
आपले पोर्टल अपरिहार्य कारणांमुळे काही दिवस बंद राहील, असे आपणास १५ ऑक्टोबर २०२४ रोजी कळविण्यात आले होते. याबाबत असंख्य लेखक, कवी, वाचक यांनी विचारणा केली होती. जमेल तसे त्या त्या सर्वांना कळवित होतोच. असो.

तर आम्ही काही मित्र मंडळी १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान “अंदमानच्या सफरी”वर गेलो होतो. इतक्या दूर गेलो की, बरेचदा नेटवर्क च्या अडचणी, वेळेतील तफावत, पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येणे, अशा विविध बाबींमुळे पोर्टल चालविता येणे कठीण जाते आणि त्यात आपलं पोर्टल हे व्यावसायिक स्वरूपाचं नसल्यामुळे आपण पगारी कर्मचारी वर्ग ठेवलेला नाही.
एक खूश खबर मात्र आहे, ती अशी की, या अंदमान सफरीत सहभागी झालेल्या आपल्या पोर्टल च्या नियमित लेखिका प्रा प्रतिभा सराफ या “अंदमानची सफर” ही लेख माला लिहीत असून ती सचित्र तसेच व्हिडिओ लिंक सह लवकरच आपल्या पोर्टल वर प्रसिद्ध होणार आहे. विविध पुस्तकं प्रकाशित झालेल्या, अनेक पुरस्कार प्राप्त, शैलीदार लेखिका प्रा प्रतिभा सराफ यांची ही लेखमाला आपल्याला नक्कीच आवडेल, असा विश्वास आहे. जे अजून अंदमान ला गेलेले नाहीत त्यांना तर ही लेखमाला आवडेलच पण जे जाऊन आले आहेत, त्यांना सुध्दा ही लेखमाला पुन्हा एकदा अंदमानचा आनंद देईल, असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
– संपादक
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
काही काळ पोर्टल बंद का? हा प्रश्न मनात होता.या काळात आपण आंदमानला गेला हे आजच्या लेखातून समजले. आंदमानच्या सफारीचे सविस्तर वाचण्याची उत्सुकता आहे.
आपण जाहिरात देऊन टाकली आता मला ताबडतोब लिहिण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रयत्न करते आपले वाचक नक्कीच स्वागत करतील🙏