ह्या मंगल, पावन दिनी
युगाधीचा झाला आरंभ
परशुराम, बसवेश्वरांचा जन्म
व्यासांद्वारे लिखाण प्रारंभ.. १
वंदनीय झाली ही पृथ्वी
स्वर्गगंगा आली धरेवरी
करा पित्रुपूजन या दिनी
पुण्याची झोळी खांद्यावरी.. २
अक्षय तृतियेला झाली
कृष्ण सुदाम्याची भेट
अनोखे असे मैत्र बंध
नसे मैत्रित त्यांच्या घट…. ३
पवित्र, मंगल दिनाला
पुण्य मिळे हो दानाने
जगतजेत्या कृष्णाने
दिले अक्षयपात्र प्रेमाने… ४
वस्त्रहरणाच्या वेळी
कृष्ण, पांचालीचा रक्षक
अक्षयवस्त्र पुरवुनी तिला
द्रौपदीचा बनला तारक…. ५
अक्षय तृतियेला मिळे
दानाने आनंद अक्षय
श्रीविष्णु नामस्मरणाने
सुखशांतीचा होई संचय…. ६
— रचना : डॉ दक्षा पंडित. दादर, मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800