Saturday, May 17, 2025
Homeबातम्याअनंता ला हवीय मदत !

अनंता ला हवीय मदत !

बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव येथील मोल मजुरी करणाऱ्या श्री जगदीश मशितकर व सौ अनुसया ह्यांना दोन मुले असून ती दोघेही मोल मजुरी करून आपला उदर निर्वाह करीत असतात. दोन मुलांपैकी लहान मुलगा अनंता ह्याची चार वर्षांपूर्वी किडनी निकामी झाली होती. त्यावेळी त्याच्या आईने त्याला आपली एक किडनी दिली होती. त्यावेळी किडनी बसविण्यासाठी आणि इतर उपचारांना जवळपास ५ लाख खर्च आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीमुळे, अन्य संस्था आणि व्यक्तींनी मदत केल्याने तसेच एक एकर जमीन विकल्याने हा खर्च भागविता आला.

किडनी ट्रान्सप्लांट झाल्या वर अनंताची प्रकृती उत्तम झाली होती. तो आपल्या कामाला सुद्धा लागला होता. मजुरी करून तो दर महिन्याला ५ ते ६ हजार कमाई करीत होता. त्याला दोन लहान मुलं सुद्धा आहेत. पण आता त्याची किडनी पुन्हा व्यवस्थित काम करीत नाही त्यामुळे त्याला पुन्हा फार त्रास होत आहे. जेवण कमी झाले असून सतत थकवा जाणवत आहे. त्यामुळे त्याला आता मजुरी कामही करता येत नसल्याने त्याचा रोजगार बंद पडला आहे. उत्पन्नाचे दुसरे काही साधन नाही. त्यात आता पुन्हा किडनीच्या उपचारासाठी डॉक्टरांनी ४ लाख रुपये इतका खर्च सांगितला आहे.
घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याकारणाने एवढी मोठी रक्कम ते स्वतः उभे करू शकत नाही, त्यामुळे या कुटुंबाने समाजातील सर्व दानशूर व्यक्तींना विनंती केली आहे आहे की आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना आर्थिक मदत करावी.

आपण आपली मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता.
नाव : Anant Jagdish Mashitkar
बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
A/c no.- 38355926730
IFSC : SBIN0006292
शाखा : – माटरगाव
जिल्हा: बुलढाणा
Phone pe : 7559457017

अधिक माहिती साठी आपण श्री नंदू वैद्य, खामगाव ह्यांच्याशी 9579085421 ह्या मोबाईल वर संपर्क साधू शकता.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील on आमचा वाडा…
कविता बिरारी on पहलगाम
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on स्नेहाची रेसिपी’ – १३
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : ४८
विजया वाळुंज on जशाच तसे
अरविंद विनायक ढवळे on “पद्मश्री” उदय देशपांडे
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी on माझी जडणघडण : ४८
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यम गोंधळ : संनियंत्रण आवश्यक
Pratibha Saraph on काही अलक
शितल अहेर on जशाच तसे
प्रदीप पाटील on जिचे तिचे आकाश : ८