Sunday, April 21, 2024
Homeलेखअमेरिका : थंडीतली झाडं

अमेरिका : थंडीतली झाडं

या महिन्यात (डिसेंबर) अमेरिकेत सर्वत्र दिसतात झाडांच्या काड्या ! काही थोडी मात्र हिरवीगार झाडे आजूबाजूला असतात. जी झाडं कोनिकल शेप मध्ये असतात, त्यांचे खोड जाड आणि उंच असते, अशी झाडं डोंगरांच्या उतारावर दिसतात. त्यांना माऊंटन ट्रिज (Mountain trees) किंवा कोनिफेरस (Coniferous) असे म्हणतात. पाईन, देवदार, सिल्हरफर, spruce, cedar ही झाड ख्रिसमस ट्री म्हणून जास्त वापरली जातात. कोनिफर झाडांना पाईन कोन असतात किंवा सुई सारखी needles असतात आणि ती सदाहरीत असतात.

त्यांच्या आकारामुळे त्यावरचे पाणी खाली पडते किंवा झाडावर स्नो ही कमी रहातो. स्नो मध्ये ही झाडे खूप छान दिसतात.
Norway spruce हे traditional ख्रिसमस ट्री आहे.
हिरवी ख्रिसमस ट्री आशा ( होप ) आणि जीवन ( life ) ह्याचे प्रतिक आहे. आणि सर्वत्र डेकोरेशन साठी लावलेले star म्हणजे येशू च्या जन्माच्यावेळी आकाशात दिसलेल्या star चे प्रतिक असतात. इतरही १२ गोष्टी ह्या कसल्यातरी गोष्टींचे प्रतिक म्हणूनच सजावटीत वापरलेल्या असतात. घरात, ॲाफिसमध्ये, मॅालमध्ये कृत्रिम ख्रिसमस ट्री लावून, वेगवेगळ्या प्रकारे ते झाड सजवतात.

ख्रिसमस मध्ये सर्वत्र Holly tree च्या पानांचे डेकोरेशन दिसते.. ती झाडे आधी फारशी पहाण्यात आली नव्हती, ती यावेळी पाहिली. १०/१५ फूट वाढणारी ही झुडपं असतात. ह्या झाडांची पाने कातर कातर, काटेरी व जाड, तुकतुकीत असतात. नेहमी हे झाड हिरवेगार असते. थंडीत त्याला छोटी फळे लागतात. बेरी म्हणतात त्यांना ! खूप प्रकारची झाडे असतात आणि त्याप्रमाणे बेरींचे रंग पण वेगवेगळे असतात. पण ही फळे विषारी असतात. फक्त पक्षी खातात. छोटी मुले आणि पाळीव प्राण्यांना ही फळे खाऊन धोका असतो. थंडीत जेव्हा इतर झाडांची पाने नसतात तेव्हा पक्षी ह्या झाडांचा आसरा घेतात.

ह्या झाडांचे डेकोरेशन दरवाज्याला बाहेर लावलेले असते. Wreaths म्हणतात त्याला. ते दाराला लावल्यावर दुष्ट, अमंगल प्रवृत्तीपासून घराचे संरक्षण होते, आजारापासून मुक्तता मिळते. हे झाड दारात असले तर सुख, समृद्धी, शांती मिळते असा समज आहे. ह्या झाडाला पाहून तुमची आतली शक्ती जागृत होते आणि कठिण परिस्थितीला सामना देण्याची शक्ती मिळते अशीही एक समजूत आहे.

wreaths चा गोल आकार म्हणजे जणू आपले चिरंतन, आदि आणि अंत नसलेले जीवन आहे आणि holly leaves आणि berries म्हणजे येशू ख्रिस्ताचा काटेरी मुकूट आणि रक्त ह्यांचे प्रतिक आहे.
आपल्या इथे ही अनेक झाडाबद्दल अशा समजुती असतातच की !

डिसेंबरमध्ये आणखी अमेरिकाभर दिसणारे सुंदर झाड म्हणजे poinsettia. हे कुंडीत जास्त दिसते, पण झुडूपासारखे किंवा त्याहून मोठेही काही ठिकाणी दिसते. एकट्या अमेरिकेत फक्त ६ आठवड्यात जवळ जवळ ७० मिलीयन इतकी poinsettia ची झाडं विकली जातात. डेकोरेशन म्हणून ही झाडं दिसतात. कारण ह्या झाडाची वरची काही पानं लाल फुला सारखी दिसतात. आणि खाली हिरवी डार्क पानं ह्यामुळे ह्या झाडांचे सुंदर डेकोरेशन सर्वत्र दिसते.
कधीकधी ही वरची पाने नारिंगी, गुलाबी, पोपटी, फिकट हिरवी, पांढरी किंवा मार्बल सारखीही असतात.
असा रंग येण्यासाठी त्यांना ६ ते ८ आठवडे ..रोज १४ तास डार्कनेस लागतो. म्हणजे जेव्हा थंडी सुरू होते, दिवस छोटा आणि रात्र मोठी होते तेव्हा त्यांची रंग बदलण्याची प्रक्रिया सुरू होते.

मात्र त्यांना दिवसाचा उजेडही हवा असतो. खालची पाने हिरवी असतात. ह्या रंगीत पानांच्यामध्ये पिवळ्या छोट्या फुलांचा झुपका असतो आणि ही फुलं unisex असतात म्हणजे एकतर मादी तरी असतात किंवा नर.! कुंडीत हे झाड २/३ महिने राहू शकते.

हे झाड मुळचे मेक्सिकोतले.. १८२० मध्ये अमेरिकेत आणले गेले. ते विषारी समजतात.ह्या झाडाला थोडे पाणी लागते. आठवड्यातून एकदा नीट घातले तर पुरते.
फांदी लावून किंवा पान सुध्दा देठापासून काढले तर ते लावून सुध्दा हे झाड येऊ शकते . पानातून आलेला चिक वाळला की पावसाळ्याच्या सुमारास ते लावले तर डिसेंबर पर्यंत रंग बदललेले झाड आपले घर सुशोभित करू शकते.

ही सर्व झाडं, डिसेंबर महिन्यातल्या स्नो मुळे डल झालेले वातावरण रंगीत करतात..

— लेखन : चित्रा मेहेंदळे.. अमेरिका
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
(पूर्व प्रसिध्दी : अंतराळ मासिक, न्यूजर्सी)

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments