Thursday, May 30, 2024
Homeसाहित्यअलका : काही कविता

अलका : काही कविता

अलका : काही कविता

आपल्या न्युज स्टोरी टुडे पोर्टल च्या निर्मात्या सौ अलका भुजबळ यांच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त प्रतिभा पिटके, अमरावती यांनी
लिहिलेली “प्रेरणेचा झरा : अलका भुजबळ” ही जीवन कथा वाचून पुढील कवींनी कविता पाठविल्या आहेत. त्यांच्या पैकी श्री अतुल सोनवणे,एम टेक यांची कविता आपल्या पोर्टलवर पहिल्यांदाच प्रसिध्द होत आहे. न्युज स्टोरी टुडे परिवारात त्यांचे मनःपुर्वक स्वागत
आहे.
– संपादक

१. प्रेरणेचा झरा : “अलका”ताई

जाणून घेऊया प्रेरणेचा झरा l
साठाव्या वाढदिवशी अलकाताईचा जरा ll1ll

सन 1964, 18 एप्रिल रोजी नाजूक सुंदर उमलली कळी l
पाहून सारे म्हणाले, लक्ष्मी, सरस्वती आली घरी ll2ll

हसली खेळली बालपणी, मित्र-मैत्रिणीत रमली l
बारावीनंतर, बीकॉम, डिप्लोमा इन एच आर कॉम्प्युटर
ही शिकली ll3ll

हुशार असल्याने, एमटीएनएल मध्ये सहज नोकरी मिळाली l
देवेंद्र भुजबळ यांसोबत ती लग्नाच्या बेडीत पडली ll4ll

असे कळीचे फुलात रूपांतर होऊन, संसारात रमली l
कन्यारत्न “देवश्री” च्या रूपाने जीवनात आनंदावली ll5ll

संसारात कुठे स्थिरता येताच, जीवा-भावाचे नाते जुळताच, हास्याच्या झर्‍याला या लागली “कॅन्सर”ची कळा l
आत्मविश्वासाने उभे राहून, संघर्ष करून, त्यावर ही मात देत, या ताईने रचला, इतिहासच खरा ll6ll

हो त्या संघर्षातूनच “कॉमा” पुस्तक उदयास आले l
व्याधीग्रस्तांना मदत, प्रेरणादायी संदेश, मानसन्मान मिळाले ll7ll

असे हे, रोपाचे वटवृक्षात रुपांतर होत गेले l
घरोघरी प्रेरणादायी संदेश “न्यूज स्टोरी टुडे” च्या माध्यमातून जगभरात वाचकांच्या भेटीस आले ll8ll

असे पाहता पाहता क्षण अतुल, आयुष्य संपत चालले l
पण “अलका” ताईंचे दिवसेंदिवस व्यक्तिमत्त्व
अष्टपैलू, उत्साही, निर्भीड होत गेले ll9ll

अशा या “अलका” ताईस, प्रेरणेच्या झरेस,
अतुलनीय हृदयातून शुभेच्छा तुला l
दीर्घ आयुष्य, सुख-समृद्धी लाभो तुला ll10ll

अजरामर राहो तुझी गाथा l
तूच आमचे सखी मैत्रीण अतुल,
येतेस रोज भेटीस “न्यू स्टोरी टुडे” च्या माध्यमातून आता ll11ll

रचना : अतुल सोनवणे एमटेक, ठाणे.

२. आमची अलकाताई

नाकी डोळी छान, सौंदर्याची खाण
अलकाताई आमुच्या सर्व गुणसंपन्न नी बुध्दीमान
वेबपोर्टल ची धुरा सांभाळली छान
उत्कृष्ट पोर्टलचा मिळविला सन्मान ||

कॅन्सर सारख्या आजारावर केली धैर्याने मात
नातेवाईक, मित्रमंडळीची प्रेमाची साथ
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा झेपावल्या आसमंतात
“काॅमा” सारखे पुस्तक लिहून दाखविली कॅन्सरग्रस्तांना वाट ||

सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम राबविले
माणुसकी, सावित्रीबाई फुले सन्मान भूषविले
देवेंद्र, देवश्रीची त्यांना सदैव साथ
न्युज स्टोरी टूडे, एक कुटुंब साथ साथ ||

या रणरागिणीची भरारी अशीच उंच जावो
लक्ष्मीनारायणाचा जोडा जन्मला जावो
देवश्रीस तुमची छत्रछाया दीर्घ काळ लाभो
सुख शांती समृद्धी तुम्हांस लाभो
आजच्या शुभदिनी शुभेच्छांचा वर्षाव होवो ||

रचना : आशा दळवी. फलटण, सातारा

३. अलकाजी प्रणाम

मुबारक हो तुमको जनम दिन तुम्हारा
आभासी पटेल पर पयगाम स्वीकार करो हमारा

दुःख तुम्हारे पास ना आये
हरदम तुम रहो छाये छाये

तस्वीर मे हम ने देखा है तुमको
बडी मनभावक प्यारी लगती है हमको

बडे प्यार से हमारा साहित्य छपवाती
हमारी सब देश मे पहचान कराती

तुम्हारे दिल की मुरादे सब पुरी होवे
हमारे दादा का हाथ हमेशा तुम्हारे सर पर रहे

अल्लाह से दुवा है हमारी
हर कामना होवे पुरी तुम्हारी

प्रा.अनिसा सिकंदर. दौंड, पुणे

अलका, तुझ्या साठाव्या वाढदिवसानिमित्त तुझ्यासाठी शब्द सुमनाने गुंफलेली, माझ्याकडून कवितारुपी शुभेच्छा !

४. आनंदी व्यक्तिमत्व

संपला प्रवास घड्याळ सोबतीचा
नियम बंधन भिरकावून सारे
जीवनात वाहू देत मतलई वारे //१//

सरला काळ असंख्य कर्तव्यात
नको प्रश्न, नको उत्तर
स्वच्छंदी मनाला दे भरार //२//

विसाव जरा नव्या वळणावर
क्षणभर भूतकालीन आनंदाला आठव
नि वर्तमानातील संकटांना,
अलगद लपव //३//

कोण म्हणतं साठी आली !
ही वयाची नटखट अवखळ काठी
जगणे आता स्वतः साठी //४//

आयु वळणावर गवसले बालपण
निष्पाप बालमनी हट्ट कर
स्वैर जीवनी फेर धर //५//

मिळाला आयुष्याचा सारीपाट नवा
प्रत्येक क्षण आनंदात मिरव
नटखट बालपण मजेत घालव//६//

आली आता आयु संध्याकाळ
नको ठेवू भ्रम हा मनात
दुसऱ्या डावाची आहे
ही सुरुवात //७//

अंतर्मनात लपवत असतेस स्वसमस्यांना
तरीही पसरतेस हर्ष चारी दिशांत
नि फुलवतेस हास्य सदा ओठात //८//

रचना : सौ वर्षा भाबल. नवी मुंबई.

५. अलका@only60.

काल (18 एप्रिल) एका गुणी व्यक्तीचा सुदंर ‘कृतज्ञता दिन’ म्हणून सौ.अलका देवेंद्र भूजबळ चा वाढदिवस साजरा झाला.
आयुष्य हे निरंतर चालूच असतं.
कधी अडथळ्यांची प्रचंड शर्यत असते.
तर कधी हिरवळीतील सुंदर वाट असते.
अश्याच वाटचालीतून स्वतःचं कर्तुत्व सिद्ध करत एक व्यक्ती अनेक क्षेत्रात उंच भरारी घेते तेव्हा तिच्या यशाकडे बघुन जेव्हा आपलीही मान तिच्या स्वाभिमानाने उंच होते.
अशी आपली सर्वांची आवडती व्यक्ती (आपली सखी)
सौ अलका देवेंद्र भूजबळ वयाची @only 60
नंबर पूर्ण करत आहे.
अश्या उत्साही हरहुन्नरी, मनमिळाऊ, बहुगुणी, आपल्या सखीवर
वाढदिवसानिमित्त हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत
आहे. काही सख्यांनी, नातेवाईकांनी तिच्यासाठी उत्स्फूर्तपणे
वाढदिवस साजरा करण्यात आला. अभीष्टचिंतन देत औक्षण करण्यात आले. कार्यक्रम खुपच छान झाला. अश्या अफाट, उत्साही हसतमुख अलका, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तुला मानाचा मुजरा.

अलका, तुझं सामाजिक कार्य मोठं आहे
अनेक क्षेत्रात तू कार्यरत आहेस.
तुझं व्यक्तिमत्व तुझं कर्तृत्व,असं दोन तीन मिनिटात सांगीतलं आणि मोकळं झालं असं नाही आहे.
अलका,तु अनेक टिव्ही सिरीअल मध्ये काम केलंय. म्हणजे तूझ्यात उपजत कला आहे .
तुला ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्कार तसेच ‘माणूसकी गौरव’ पुरस्कार प्रदान झाले आहेत.
तू ‘काॅमा’ पुस्तक लिहिले आहे, अनेकांना तू जीवन जगण्यासाठी प्रेरणास्थान आहे.
देशविदेशात तुमच्या ‘वेबपोर्टल’च्या माध्यमातून तुम्ही दोघंही संपादक, निर्मात्या म्हणून प्रसिद्ध आहात. तुमचं नवीन अपत्य ‘न्यूज स्टोरी टुडे’ वेब पोर्टल’ हे आम्हाला आनंद देत आहे. आम्हाला ही हे अपत्य छान खेळवतं, रमवतं, खुश करत, वेगवेगळ्या विषयांवर समृद्ध करत आहे.
आम्हाला छान वाचक होत होत आम्हांला हे अपत्य (वेब पोर्टल) लिहितं ही करत आहे. नवोदितांना तर हे मोठं व्यासपीठ आहे.
बरं, एवढंच करून थांबलयं का…?
तर नाही ..
आमच्या लेखनाचा संग्रह करत आमची पुस्तकं ‘न्यूज स्टोरी टुडे’ मार्फत प्रकाशित करत आहे.
तुमच्या या वेब पोर्टल मुळे आम्ही नावारुपाला येत आहोत म्हणजे तूम्ही आम्हाला साहित्यक्षेत्रात प्रगतीपथावर आणत आहात.
म्हणजे तुझ्या बरोबर तू आम्हाला ही आमच्या कलेला दाद देत वाट मोकळी करून देत आहेस.
अलका, तुझ्या आयुष्याचा साथीदार, जोडीदार नाव आहे ‘देवेंद्र’ आडनाव आहे ‘भुजबळ’ देत आहे बळ.
आम्हांला देताय साहित्यक्षेत्रात पाठबळ.

अशी सखी मला मिळाली मी स्वतःला खुप भाग्यवान समजते. तुला वाढदिवसाला अनेक अनेक मानसिक, शारीरीक, वैचारिक, अश्या आरोग्यमय हार्दिक शुभेच्छा देत तुझे पुढील आयुष्य सुख, समृद्धी, स्वास्थ्यानी सतत भरलेले राहो

रचना : सौ पूर्णिमा शेंडे. चेंबूर, मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments