विविध प्रकारची गाणी, नृत्य, एकपात्री प्रयोग, गप्पागोष्टी, किस्से अशा बहुरंगी कार्यक्रमांनी न्यूज स्टोरी टुडेच्या निर्मात्या अलका भुजबळ यांचा साठावा वाढदिवस उत्तरोत्तर रंगतच गेला.
अलका भुजबळ यांच्या एमटीएनएल, त्या रहात असलेल्या मिलेनियम टॉवर्स मधील मैत्रिणी आणि न्युज स्टोरी टुडे पोर्टल च्या लेखिका, कवयित्री यांच्या पुढाकाराने हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर महिला व पुरुषांनी हजेरी लावत अलका भुजबळ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
.सुरवातीला अलकाचा जन्म मुंबईत झाल्याचे सांगून तिचे बालपण, विविध खेळात खासकरून जिमनॅस्टिकमध्ये गेल्याचे
सूत्र संचालक प्रा डॉ.संजीवनी कुमार यांनी सांगितले आणि अलकासाठी तिच्या आवडीचे “दिलं है छोटासा, छोटीशी आशा…चाॅंद तारोको छुनेकी आशा…असे सुरेल गीत सादर केले.
यावेळी गप्पागोष्टी फेम जयंत ओक यांनी सुरेल आवाजातील काही गाणी सादर करुन अलका भुजबळ यांच्या कार्याचा गौरव करीत उदंड आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.
- अंजली यांनी दिलं है छोटासा छोटीसी आशा” म्हणुन लहानपणीच्या आठवणी ला उजाळा दिला.
शारदा आणि सुशील शेटे यांनी “पत्ता पत्ता…भुटा भुटा …हाल हमारा जाने… हे गीत सादर केले. तर सुनीता यांनी “ये तेरा घर ये मेरा घर” गाण्या मधुन २० व्या वर्षातील अलका कशी असेल याचे वर्णन केलें.
व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेल्या, लेखिका मेघना साने यांनी “आधी दंगल, मग शुभमंगल” ही एकपात्री नाट्यछटा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
गायक हेमंत साने यांनी सादर केलेल्या ओ मेरी जोहरा जबी…या गाण्याने तर सर्व उपस्थित डोलायला लागले. सर्वांनी उस्फूर्तपणे या गाण्याला वन्स मोर दिले आणि परत त्या गाण्यात सर्व रंगून गेले.
पर्यावरण तज्ञ, सुधीर थोरवे यांनी ल…ल…ला.. गुलाबी डोळे…कळली जादू तुझ्या नजरेची असे बहारदार गीत, हिंदीचे गाणे मराठी मध्ये साभिनय सादर करुन कार्यक्रमात धमाल आणली.
सौ वर्षा महेंद्र भाबळ आणि पूर्णिमा शेंडे यांनी आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करीत अलकामुळे आपण न्युज स्टोरी टुडे पोर्टल वर लिहिते झालो आणि त्या लिखाणाचे पुस्तक लिहून लेखिका बनल्याचे सांगून अलकासाठी ‘अनन्य व्यक्तिमत्त्व’ नावाची कविता सादर केली आणि भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
निवृत पोलीस उप अधीक्षक सुनीता नाशिककर यांनी न्युज स्टोरी टुडे पोर्टल वर लिहिता लिहिता अलकाशी कशी मैत्री झाली, हे सांगत अलकाने काॅमा घेतला, फुलस्टॉप नाही, असे सांगून तिने कॅन्सरवर कशी मात केली, असे सांगून त्यावर आलेल्या अनुभवातून काॅमा हे पुस्तक लिहिले, याबद्दल गौरवोद्गार काढले.
निवृत्त सह सचिव श्री राजाराम जाधव हे कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी अलकासाठी लिहिलेली कविता त्यांचे पुत्र प्रतिक यांनी सादर केली.
प्रतिमा यांनीही “मेरे घर आयी एक नन्ही परी” हे गीत सादर केले.
अलका भुजबळ यांच्या सोसायटी मधील मैत्रिणीनी “जिंदगी मिलके बितायेंगे…आने दिन खाके सोजायेंगे” या गाण्यावर सुंदर नृत्य सादर करीत ज्या वेळी प्रेक्षकांमधून डौलदार फेरी मारली त्यावेळी सभागृहाचा कार्यक्रमाचा नूरच पालटून सर्वांनी एकदम जल्लोष केला.
शेवटी अलका भुजबळ यांच्या एम टी एन एल च्या सर्व उपस्थित मैत्रिणींनी ६० दिव्यांनी त्यांना ओवाळून त्यांचें औक्षण केलें. व नंतर वाढदिवसाचा केक कापून सगळ्यांनी नंतर हॅपी बर्थडे टू यू…तुम जिओ हजारो साल, बार बार…ये दिन आये असे गाणे म्हणत अलकावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी अलकापती देवेंद्र भुजबळ यांनी सर्वांना साथ देत शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सर्वांनी कसे माझ्यावर भरभरून प्रेम केले आणि आणि जवळच्या नातेवाईकांनी कॅन्सरच्या काळात केलेली मदत व आताही त्यांच्यातील प्रेमामुळे आणि न्युज स्टोरी टुडे च्या लेखक, कवी यांच्या मुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळते, अशा कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करीत अलका भुजबळ यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी आपले पती देवेंद्र भुजबळ व कन्या देवश्री यांची साथ आणि मिळालेल्या प्रोत्साहनामुळे साठीपर्यंतचा पल्ला गाठू शकले, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. निमित्त वाढदिवसाचे असते पण लोक आपल्यावर किती प्रेम आणि जिव्हाळा लावत असतात, असे सांगत विशेषतः एमटीएनएलमधील सहकारी महिलांचा अलका भुजबळ यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.
प्रारंभी कवयित्री सौ पौर्णिमा शेंडे यांनी सर्वांचे स्वागत करून आपले मनोगत व्यक्त करतांना आपण न्युज स्टोरी टुडे ने कसे घडत गेलो याचे छान कथन केले.तसेच अलका भुजबळ यांच्या वर केलेली कविता सादर केली.
तर पुढील कार्यक्रमाची सुरुवात एम टी एन एल चे उप महाव्यवस्थापक तथा गायक श्री सुशील शेटे यांनी गणेश वंदना सादर करुन केली.
या दिलखुलास कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.संजीवनी कुमार सुंदररित्या केले.
शेवटी स्नेह भोजनाने या अविस्मरणीय वाढदिवसाची सांगता झाली.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
‘ प्रा. डाॅ.सतीश शिरसाठ
वाढदिवस एकदम झकास झालेला दिसतोय.
पुनश्च अभिनंदन
हो सर खुप छान झाला अगदी momorable
Happy birthday
धन्यवाद
|| गुरुकृपा ||
नमो नमः, भगिनी अलका महोदया…! 🙏☺️
जन्मदिवसप्रीत्यर्थे अभीष्टचिंतनम् करोमि
तथा च
आगामी जीवनकारणे शुभाशया: ददामि..!! 💐💐💐🙏☺️
शुभम् भवतु..! मंगलम् भवतु ..!
💐💐💐💐💐
… प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
धन्यवाद सर
छान 👌👌