खेळ, अभिनय, समाज कार्य, कामगार कल्याण, लेखन, प्रकाशन, पर्यटन, सूत्र संचालन अशा विविध बाबींमध्ये सक्रिय असलेल्या अलका भुजबळ यांची मुलाखत उद्या, गुरुवारी, १० एप्रिल २०२५ रोजी मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीवर हॅलो सखी कार्यक्रमात दुपारी १२ वाजता थेट प्रसारित होणार आहे. ही मुलाखत लोकप्रिय सूत्र संचालक डॉ मृण्मयी भजक या घेणार असून कार्यक्रमाच्या निर्मात्या संध्या पुजारी आहेत.
अल्प परिचय :-
अलकाताईंना ७ वर्षांपूर्वी कॅन्सर चे निदान झाले होते. पण कॅन्सर ला न भिता त्यांनी धीराने तोंड दिले. त्या अनुभवावर आधारीत लिहिलेल्या *कॉमा* या पुस्तकाबद्दल त्यांना *जाणिव* पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
“कॉमा” नावानेच निर्माण झालेल्या माहितीपटाचे प्रकाशन राजभवनात तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारी यांच्या हस्ते झाले. आता त्या ठिकठिकाणी कॅन्सर विषयक जनजागृती करण्यासाठी “कॉमा संवाद उपक्रम” राबवित असतात. रेडिओ, टिव्हीवर मुलाखती देत असतात. तसेच लेखन ही करीत असतात.
कोरोना काळातही गप्प न बसता त्या कॅन्सर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे ऑनलाईन मार्गदर्शन करीत होत्या. अशा प्रकारे त्या कॅन्सरग्रस्त व्यक्ती व कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी सतत सक्रिय असतात.
अनेक सांस्कृतिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे नियोजन त्यांनी केले आहे आणि अजूनही करीत असतात.

दूरदर्शन वर प्रसारित झालेल्या दामिनी, बंदिनी, हे बंध रेशमाचे, महाश्वेता, आई, पोलिसातील माणूस, जिज्ञासा या मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
सौ अलका भुजबळ ह्या “न्यूज स्टोरी टुडे” या आंतरराष्ट्रीय पोर्टल च्या निर्मात्या असून हे पोर्टल ९० देशात पोचले आहे. या कामगिरीबद्दल त्यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार, माणुसकी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मैत्रिणींच्या आग्रहाखातर प्रकाशन व्यवसायात झेप घेणाऱ्या अलका भुजबळ यांनी अल्पावधीतच पुढील पुस्तके प्रकाशित केली आहेत.
१) “जीवन प्रवास”
लेखिका : सौ वर्षा भाबळ. नवी मुंबई
२) समाजभूषण २
लेखिका : सौ रश्मी हेडे. सातारा
३) मी, पोलीस अधिकारी
लेखिका : सुनीता नाशिककर. निवृत पोलीस उप अधीक्षक, मुंबई
४) पौर्णिमानंद (काव्य संग्रह)
कवयित्री : सौ पौर्णिमा शेंडे, निवृत्त उप महाव्यवस्थापक, एमटीएनएल,मुंबई.
५) चंद्रकला (कादंबरी)
६) अजिंक्यवींर” (आत्म कथन)
७) अंधारयात्रीचे स्वप्न (वडिलांचे चरित्र)
८) “हुंदके सामाजिक वेदनेचे” (वैचारिक लेख संग्रह)
उपरोक्त चारही पुस्तकांचे लेखक निवृत्त सह सचिव श्री राजाराम जाधव हे आहेत.
९) आम्ही अधिकारी झालो
१०) करियर च्या नव्या दिशा
उपरोक्त दोन्ही पुस्तकांचे लेखक निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ हे आहेत.
११) मी शिल्पा…
चंद्रपूर ते केमन आयलँड्स
लेखिका : शिल्पा तगलपल्लेवार – गंपावार केमन आयलँड्स
१२) सत्तरीतील सेल्फी
लेखक : निवृत दूरदर्शन संचालक श्री चंद्रकांत बर्वे, मुंबई.
इतर काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
अशा ह्या अष्टपैलू, उत्साही, हरहुन्नरी, मनमिळाऊ व्यक्तिमत्व लाभलेल्या सौ अलका भुजबळ यांचा संपर्क तपशील पुढील प्रमाणे आहे.
मो. ९८६९४८४८००
ईमेल : alka.bhujbal1964@gmail.com
वेब : www.newsstorytoday.com
नमस्कार मंडळी.
आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.
आपला लोभ असाच कायम राहिल अशी आशा आहे.
मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा.
नमस्कार अलकाताई…!
गुरुकृपा संस्थेच्या सर्व सभासदांच्या वतीने
मनःपूर्वक शुभेच्छा…! 💐💐
… प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007