Saturday, April 13, 2024
Homeबातम्या"अविष्कार" चे निकाल

“अविष्कार” चे निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’अविष्कार -2023’ आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेतील विविध गटातील 42 विजेत्या स्पर्धकांना कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांच्या हस्ते कला पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

अविष्कार – 2023 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 100 पेक्षा अधिक महाविद्यालयातील 456 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी) चे 239, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे 187, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी) चे 30 स्पर्धक सहभागी होते. अशा प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपापल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. परीक्षाणाअंती विविध गटातील एकूण 42 स्पर्धेकांची प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पारिताषिक वितरणात वाणिज्य, व्यवस्थापन व विधी संवर्गात पदवी संवर्गात नाशिकचे मोतिवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या पल्लवी पाटील यांनी प्रथम, नाशिकचे महात्मा गांधी विद्यामंदिरचे के.बी.एच. दंत महाविद्यालयाच्या श्रुती देशमुख यांनी व्दितीय तर नाशिकच्याच मोतिवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या हर्षदा महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकविला आहे.

पदव्युत्तर पदवी शाखेच्या मुंबईचे पी.डी. हिंदुजा कॉलेजचा अमंडा डिसुझा यांनी प्रथम, नागपूरचे व्हि.एस.पी.एम डेन्टल कॉलेज नागपूरचा चेतन पळसकर यांनी व्दितीय तसेच पुण्याचे धोंडूमामा साठे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजची स्मिता गोंजारी यांनी तृतीय क्रमांक मिळाला आहे.

मानव्यविद्या भाषा व ललीतकला संवर्गातील पदवीचे मुंबईचे के.जे. सोमय्या कॉलेजचा झिल दोशी यांनी प्रथम व मुंबईचे पी.डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगचा ऋतिका गायकवाड यांनी व्दितीय क्रमांक तसेच पुण्याचे संचेती इंन्स्टिटयुट ऑफ फिजिओथेरपीची आदिती गहरकर यांनी तृृतीय क्रमांक मिळाला आहे. याच संवर्गातील पदव्युत्तर पदवीचे पुण्यातील श्रीमती बकुळ तांबट इन्स्टिटयुट नर्सिंगची भक्ती कुलकर्णी यांनी प्रथम, नागपूरचे रणजित देशमुख डेंटल कॉलेजची मनाली जयस्वाल यांनी व्दितीय तसेच पुण्याचे डी.एस. होमिओपॅथी कॉलेजचा तनया सोवनी यांनी तृतीय क्रमांक मिळाला आहे.

मानव्यविद्या भाषा व ललीतकला संवर्गातील पीपीजी संवर्गातील मुंबईचे पी.डी. हिंदुजा कॉलेज ऑफ नर्सिंगची पुजा नायर यांनी प्रथम व छत्रपती संभाजीनगरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचे किशोर सुरवासे यांनी व्दितीय क्रमांक मिळाला आहे.

शेती आणि पशुसंवर्धन संवर्गातील पदवीचे नाशिकचे मोतिवाला नॅशनल होमिओपॅथी मेडिकल कॉलेजची कृृतीका भंडारी यांनी प्रथम, आण्णासाहेब डांगे मेडिकल कॉलज सांगलीची नेहा तांबीले यांनी व्दितीय, के.जे सोमय्या कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची कल्याणी देशमुख यांनी तृतीय क्रमांक मिळाला आहे. याच संवर्गातील पदव्युत्तर पदवी शाखेच्या धोंडूमामा साठे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्रतिक जलेरा यांनी प्रथम क्रमांक मिळाला आहे.

विज्ञान संवर्गातील पदवीचे नाशिकचे आर्युवेद सेवा संघ आर्युवेदीक कॉलेजची वैभवी जाधव यांनी प्रथम, नाशिकचे आर्युवेद सेवा संघ आर्युवेदीक कॉलेजची अक्षया राहुरकर यांनी व्दितीय, नाशिकचे डॉ. राजेश कांबे डेन्टल कॉलेजची श्रुतिका पवार यांनी तृतीय क्रमांक मिळाला आहे. याच संवर्गातील पदव्युत्तर पदवी शाखेच्या अहमदनगरच्या यशवंतराव चव्हाण डेन्टल कॉलेजचे करण गाडा यांनी प्रथम, पुण्याच्या टिळक आर्युवेद महाविद्यालयची सानिया दांडेकर यांनी व्दितीय, पुण्याचे काशीबाई नवले कॉलेज ऑफ फिजीओथेरपीचा सलोवा शब्बीर अहमद पारकर यांनी तृतीय क्रमांक मिळाला आहे. याच संवर्गातील पीपीजी संवर्गातील नागपुरचे व्ही.एस.पी.एम कॉलेज ऑफ फिजीओथेरेपीचे किरण मेंढे यांनी प्रथम क्रमांक मिळावला आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संवर्गातील मुंबईचे ऑल इंडिया इन्स्टिटयुट ऑफ फिजिकल मेडिसिन रिहॅबिटेशनचेची आसावरी चौधरी यांनी प्रथम, जळगांवचे डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची पलक पटेलने यांनी व्दितीय तसेच
नाशिकचे मोतिवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची प्रिया शर्मा यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. याच संवर्गातील पदव्युत्तर पदवीचे नवी मुंबई येथील जी.डी. पोळ फाउन्डेशन वाय.एम.टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची रुतुजा भोट यांनी प्रथम व कल्पीत आचार्य यांनी व्दितीय क्रमांक तसेच नाशिकचे एस.एम.बी.टी. इन्स्टिटयुट ऑफ डेन्टल सायन्सची वैष्णवी चिद्रावार हिने तृतीय क्रमांक मिळाला आहे. याच संवर्गातील पी.एच.डी. मध्ये नाशिकचे एम.व्ही.पी. कॉलेज ऑफ फिजिओथेरपीची प्रणाली पवार यांनी प्रथम पुण्याचे सिंहगड डेंटल कॉलेजचा अभय कुलकर्णी यांनी व्दितीय क्रमांक मिळविला आहे.

वैद्यक व औषध निर्माणशास्त्रश संवर्गातील पदवी शाखेतील पुण्याचे समितीबाई शहा आयुर्वेद कॉलेजची साक्षी शिंदे यांनी प्रथम, सांगलीचे आण्णासाहेब डांगे आयुर्वेद महाविद्यालयाचा प्रथमेश पाटील यांनी व्दितीय तसेच पुण्याचे संचेती इन्स्टिटयुट ऑफ फिजिओथेरपीची सायली मुनोत यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. याच संवर्गातील पदव्युत्तर पदवीच्या नाशिक येथील ए.एस.एस. आयुर्वेद कॉलेजची श्रावणी पराते हिने प्रथम व प्रियंका पवार यांनी व्दितीय क्रमांक तसेच नागपूरचे स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयाची कोमल देवताळे यांनी तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच याच संवर्गातील पी.एच.डी. शाखेच्या नवी मुंबई येथील वाय.एम. टी. आयुर्वेद कॉलेजचे जेनी भट्ट यांनी प्रथम व नाशिकचे एस.एम.बी.टी. दंत महाविद्यालयाचा अभिषेक कुरुळकर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला आहे.

अविष्कार – 2023 प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता डॉ. परशुराम पवार, डॉ. अनया पत्रीकर, डॉ. अर्चना भास्करवार, डॉ. समिर घोलप, डॉ. त्रिवेणी काळे, डॉ. कमलेश बगमार, डॉ. शितल चव्हाण,डॉ. राजेश वानखेडे, डॉ. अपूर्व शिंपी, डॉ. आशोक वानकुंद्रे, डॉ. प्रशांत विश्वकर्मा, डॉ. जितेंद्र सिंग, डॉ. एस.बी. सोनवणे, डॉ. जाई किनी, डॉ. बी. जे. पारवल, डॉ. एस.ए. तालेकर, डॉ. सुशिलकुमार झा, डॉ. निता गांगुर्डे, डॉ. सुरेखा नेमाडे यांनी सहभागी स्पर्धकाचे परीक्षण केले.

अविष्कार – 2023 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुुमार मोरे यांनी मानले.

अविष्कार – 2023 आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेकरीता विद्यापीठातील श्री. बाळासाहेब पेंढारकर, श्री. राजेश इस्ते, श्री. अविनाश सोनवणे, श्री. राजू दिवे, श्री. अर्जुन नागलोत, श्री. संदेश बारसांगळे, श्री. समाधान जाधव, श्री. घनःशाम धनगर, श्री. संतोष बागुल, श्रीमती वासंती चौधरी, श्री. निकेश बागुल आदींनी परिश्रम घेतले.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments