नूतन माध्यमिक विद्यालय हरणखेडे, ता बोदवड, जिल्हा जळगाव च्या सन 1985 पासून सुरू झालेल्या आणि सन 1987-88 या शैक्षणिक वर्षातील एस एस सीच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सुधीर चोपडे यांनी मित्र राजू खाचणे यांचे मदतीने पुढाकार घेऊन नुकताच मलकापूर येथील भातृमंडळ येथे आयोजित केला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक अशोक बोंडे, शिक्षिका सौ हेमांगी अशोक बोंडे, शिक्षक श्री के एल चौधरी, श्री चंद्रकांत भारंबे सर आणि शिपाई अर्जुन बोरोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या स्नेह मेळाव्यासाठी बहुसंख्येने विद्यार्थी सहकुटुंब सहपरिवार सहभागी झाले होते. तब्बल सदतीस वर्षांनी भेटलेल्या आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीतील आनंद तसेच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विशेषतः लग्न होऊन विखुरलेल्या मैत्रिणींची गळाभेट अविस्मरणीय आठवण देऊन गेली.
घेतलेल्या शिक्षणातून सदतीस वर्षांनी शिक्षक, डॉक्टर,प्रथितयश उद्योजक, राजकिय पदाधिकारी, व्यावसायिक, प्रगतिशील शेतकरी, गृहिणी असे विस्तारलेले सारे पुन्हा एकत्र एका ठिकाणी भेटल्याने हा मेळावा एक आनंद सोहळा झाला.
मेळाव्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राजू खाचणे, गजानन पाटील, गजानन वराडे, विकास करांडे, राजेंद्र खाचणे, सौ शारदा बोरोले बोंडे, सौ सरला झाम्बरे पाटील, सौ छाया चोपडे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
- — लेखन : बाबू डिसोजा
- — संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800