न्यूयॉर्कस्थित सांगलीची कन्या नयना निगळ्ये हिच्या ‘अशब्द’ या पहिल्या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. यातील निवडक कवितांचा ‘ओल्या राती’ हा संगीत अल्बमही यावेळी प्रकाशित करण्यात आला.
प्रसिध्द सितार वादक उस्ताद उस्मान खान आणि ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे यांच्या हस्ते दोन्हीचे प्रकाशन झाले. पुण्यातील के. एच. संचेती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात यानिमित्ताने या संग्रहातील संगीतबध्द कवितांची मैफलही रंगली.
कविता संग्रहाच्या प्रकाशानावेळी उस्मान खान म्हणाले, ‘‘नयना निगळ्ये यांच्या कविता मनाला भिडणाऱ्या आणि स्त्री-वादी आहेत. त्यांनी यापुढेही कविता लेखन सुरूच ठेवून रसिकांच्या भावविश्वात भर घालावी.’’
ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे म्हणाले, ‘‘अशब्द’ मधील कविता अनेक भावनांचा उत्तम कोलाज आहे. त्या आत्मानुभुती देतात.’’
नयना निगळ्ये म्हणाल्या, ‘‘या कविता संग्रहात कविता, गझल आणि चारोळ्या यांचा मिलाफ आहे. या माझ्या पहिल्या प्रयत्नाचे तुम्ही स्वागत करत आहात, याचा मोठा आनंद होतो आहे.’’
संवेदना प्रकाशनाचे प्रकाशक नितिन हिरवे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कविता संग्रहातील निवडक कवितांचा ‘ओल्या राती’ हा अल्बम प्रकाशित करण्यात आला आहे. त्यात प्रसिध्द गायक संजीव अभ्यंकर, संगीतकार व गायक अतुल दिवे, वैशाली राजेश यांचा स्वरसाज आहे.
“ओल्या राती” अल्बमच्या लिंकद्वारे https://www.youtube.com/watch?v=EQbzDanapHY मंत्रमुग्ध करणाऱ्या तालांच्या आणि मनमोहक सुरांच्या जगात आपण प्रवेश करू शकता.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
मनःपूर्वक धन्यवाद सर🙏🙏
नयना
अभिनंदन व शुभेच्छा नयनाताई
श्री गोविंद रामदास पाटील सर जळगाव जिल्हा जळगाव.
Thank you Sir 🙏