महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विकास विभागातील सेवानिवृत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुणे येथे नुकत्याच झालेल्या संमेलनात, दुग्ध व्यवसायबाहेरील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या १५ सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. त्यात सेवानिवृत्त उप मुख्य दक्षता अधिकारी, तथा “न्यूज स्टोरी टुडे” शी सुरुवातीपासून जोडल्या गेलेले श्री अशोक कुंदप यांचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रमणलाल मेहेर, कांतीलाल शहा, श्रीकृष्ण उत्पात व चंद्रचूड हे प्रमुख उपस्थित होते.

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या संमेलनात गुणिजणांचा सन्मान, गायन व कीर्तन असे भरगच्च कार्यक्रम, स्नेह भोजन आदींचा लाभ सर्वांनी घेतला. बोकील व मोमीन यांचे गायन झाले. ज्योती घोडके यांचे कीर्तन झाले. शेवटी कांतीलाल शहा यांनी आभार मानले.


संमेलनाचे आयोजन रामलाल मेहेर, कांतीलाल शहा, शहाजीराव देशमुख, भागवत माळी, श्रीनिवास कुलकर्णी, अरविंद कदम, श्रीकृष्ण उत्पात, अनंत खेडकर व सतीश कालगावकर यांनी केले. सूत्र संचालन भागवत माळी यांनी केले. शेवटी कांतीलाल शहा यांनी आभार मानले.

पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातून जवळपास १५० निवृत्त अधिकारी, कर्मचारी या संमेलनास उपस्थित होते.
अल्प परिचय : मूळ सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील रहिवासी असलेले श्री अशोक कुंदप यांनी शालेय शिक्षणानंतर डेअरी टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा पूर्ण केला. ते १९६९ बॅचचे आय.डी.डी अधिकारी आहेत. उपमुख्य दक्षता अधिकारी अधिकारी या पदावरून ते डिसेंबर २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले.

श्री कुंदप यांनी निवृत्तीनंतर “दूध तपासणी का व कशी करावी ?” या विषयावर २००८ मध्ये पुस्तक लिहून ते ग्रामीण भागातील २०० पेक्षा जास्त प्राथमिक दूध उत्पादक सहकारी संस्थांना वितरित केले आहे. भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीमध्ये महाराष्ट्र राज्य सल्लागार या पदावरून ग्राहकांच्या अडचणी सोडविण्याकरिता सल्ला देण्याचे कामकाज त्यांनी तीन वर्षे पाहिले आहे. याशिवाय गेल्यावर्षी त्यांनी “अन्नधान्यातील भेळ कशी ओळखाल ?” हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले आहे.
सध्या ते ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय स्तरावरील अन्नधान्यातील भेसळ प्रतिबंध या विभागाचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. ७९ वर्ष एवढे वय असूनही विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात ते स्वतः आणि पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या सौ आशाताई यांच्यासह सहभागी होत असतात.
श्री कुंदप यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800