Saturday, July 27, 2024
Homeलेखअसा रंगला झिम्मा ३

असा रंगला झिम्मा ३

🚩🚩मंगळवारी दि.५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सीवूड्स मॉलमध्ये चार नंबर स्क्रीन समोर जिथे झिम्मा २ दाखवला जाणार होता. तिथे जवळपास १५० लोक 👕👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👦‍👦👩‍👩‍👧‍👦 थिएटर चे दार कधी उघडेल याची वाट पहात उभे होते. त्या मध्ये वेळात वेळ काढून अत्यंत नटुन थटून आलेल्या आम्ही १५ जेष्ठ मुली (बायका 🤷‍♀️)🫅🏻🦹‍♀️👩🏻‍🦼👩‍🦼. आज पिक्चर बघताना डान्स वैगरे करून मज्जा करायची या तयारीत होत्या। 💃💃

पण हाय रे दैवा….!!! सिनेमा सुरू होण्याच्या पाच मिनिटं आधी अतिशय गरीब दिसणाऱ्या मैनेजरने 👨🏿‍🦰 काही तांत्रिक बिघाडामुळे आजचा शो कैन्सल झाला असल्याची शॉकिंग (दुःखद) बातमी दिली आणि संपूर्ण जमावावर शोककळा पसरली…. त्यांच्यातील गिने चुने ७/८ पुरुष जे बायको साठी खुप मोठा त्याग करून मारून मुटकून आले होते🙄🙄 ते मनातून अत्यंत आनंदित झाले. पण तो आनंद ते चेहऱ्यावर मात्र दाखवू शकत नव्हते….. उरलेल्या १४० महिला 👩‍👩‍👧 दुःखाने कोलमडल्या.🙆‍♀️ आता मी (आम्ही) काय करू ? कुठे जाऊ ? असे एकमेकींना विचारु लागल्या 😭😭. आणि त्यात आम्हीं १५ जणीही होतो.

त्या संकटाच्या निर्णायक क्षणी मुला, नातवंडांना🧍🏻मागे ठेवून, लिपस्टिक लावून💄, छान सजून धजून, किटी पार्टी अर्धवट सोडून 🏃‍♀️🏃‍♀️आलेल्या आम्ही पंधरा जणी मात्र संतापाने सैराट झाल्या. आमची लीडर अलका जिने सकाळपासूनच अत्यंत परिश्रमपूर्वक वेळ, पैसा खर्च करून सर्वांना एकत्र केले आणि पिक्चर साठी आलेल्या आम्हा सर्वांच्या कष्टांवर पाणी फिरवणाऱ्या, मराठी भाषा व माणसांचा द्वेष करणाऱ्या थिएटर मालकाच्या कृतीने रागाने बेभान झाली 😡😡व एका क्षणात तीच्या कडील सर्व शस्त्रे तलवार,⚔️ भाला, बर्ची, एके 47 🔫 हैड ग्रेनाईट व अतिशय महत्त्वाचे शस्त्र मोबाईल👩🏻‍🎨 पारजत हर हर महादेव म्हणत मॅनेजरवर तुटून पडली. तिचा तो आवेश बघून स्वतः लेखिका व आणखी दोघी मदतीला “तुम लढो हम तुम्हारे साथ है” म्हणत सोबत थांबल्या. बाकीच्या जणींना ती जिंकणारच… अशी खात्री असल्याने विश्वासाने मोक्याची सिट बघून निवांत बसून घेतले.🧘‍♀️🧘‍♀️

आता सुरू झाला महासंग्राम… तो गरीब गाईसारखा दिसणारा 😫 मॅनेजर व सोबत तसाच आणखी एक असिस्टंट गयावया करु लागला. पण आमची योद्धा (लीडर) काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. चार चार शस्त्र व धमक्या उदा. थांब झी सिनेमालाच कळवते, 🤳क्षिती जोग ला कळवते, निर्मिती सावंतला सुद्धा सांगते, मॉल मध्ये मराठी पिक्चर ची कशी गळचेपी करतात, इ.इ. हल्यावर हल्ले चढवू लागली. एवढ्यात शत्रूपक्षात (मॅनेजर), ‘ह्या पण सुपर्विझर आहेत’ असे सांगत अजुन एका बाईला सोबतीला त्यांनी पाचारण केले 🧝‍♀️
आत्ता आणखीनच मजा येणार म्हणत, मोक्याची जागा पकडून बसलेल्या सैनिकांना (आमच्या मैत्रिणींना) लढत इंटरेस्टिंग होणार याची खात्री पटली.

दरम्यान जमावातील ७/८ पुरुष गुपचूप एक एक पाऊल मागे सरकत बायको व कोपरे पकडत वेळ पडली तर कुठून पळायचे🏃🏾‍♂️🏃‍♂️ याचे प्लान करु लागले. उरलेल्या १२० महिलांमधील एक ७५ वर्षांची (छोटी) मुलगी👩‍🦯 , वाढलेला बीपी व थरथरणारे शरीर घेऊन आमच्या सोबत लढाईत उतरली 🥷.
एव्हाना लढाईला चांगलेच तोंड फुटले होते एका बाजूने सर्व शस्त्रांचा 🏹 मारा तर दुसऱ्या बाजूने आलेली शस्त्रे फक्त झेलण्याचे काम चालले होते.
अशी हातघाईची लढाई सुमारे अर्धा तास चालल्यावर तीनही मैनेजरने शस्त्रे टाकून 😔 जमिनीवर बसून भोकाड पसरण्याची तयारी केली 😬😭. तेंव्हा कुठे आमच्या लीडरचा (योद्ध्याचा) रागाचा पारा जरा खाली आला व अगदी सुरुवाती पासून विजयाची खात्री असलेल्या बसलेल्या आमच्या सैनिकांनी (मैत्रिणींनी) विजयोत्सव साजरा करायची तयारी केली, तहाची बोलणी करायला त्या सरसावल्या.

१९७१ च्या युद्धात जे पाकिस्तानचे झाले, तेच मैनेजरचे झाले. आमचा गडी युध्दात व तहात जिंकला. 🚩🚩🚩
असं म्हणतात की युद्धात जिंकणे एकवेळ सोपे असते तेवढे तहात राखणे अतिशय कठीण काम….
त्यामुळे मैनेजरने आमच्या पुढे हात टेकल्यावर तर पुढचा प्रवास त्यांचा आणखी अवघड होता. त्यांनी इतरांना फक्त रिफंडचे आश्वासन देऊन वाटेला लावले होते. जवळजवळ सगळी मंडळी पांगली होती. आम्ही मात्र रणांगण सोडायला अजूनही तयार नव्हतो, कारण ….तह…. जो आमच्या पद्धतीने आम्हाला हवा होता. ऐवढ्या मेहनतीने युद्ध जिंकल्यावर तसंच सोडायचं ? नेव्हर.. अलका आमची योध्दा पदर खोचून तयार होती।

ती म्हणाली, ‘अरे आम्ही ऐव्हढे भांडलो … घशाला कोरड पडली जरा चहा 🍵पाणी विचाराल की नाही ?’… (अलकाचा त्यांनाच दम .!! ) इथून तहाला सुरुवात .. आणि मग एकेक मागण्या पुढे सरकू लागल्या .. रिफंड तर सगळ्यांना च मिळेलच ..मग आता ? हे 🗄️ व्हाउचर्स.. देतो आणि हाच सिनेमा तुम्ही परत पहा, तुमच्या सोईनुसार, आमच्या पैशानी.. ok.okk.. य्यें बात.. क्षुश्श महत्त्वाचे तर पार पडले… मग जयाने (आमच्या सैनिकाने) पिल्लू सोडले नुसता चहा ? ..सोबत कुरूम कुरुम हवेच ..पॉपकॉर्न पाहिजे .. म्हटल्यावर, मॅनेजर आणि त्यांचा स्टाफ सगळे च्या सगळे एका क्षणात गायब…

मग अलकाने (लीडर) त्यांना शोधून काढून सगळ्या मागण्या पदरात पाडून घेतल्या… हट्ट पुरवून घेतले. मग काय विचारता…. पॉपकॉर्नचा आणि चहाचा पाहुणचार घेत आम्ही तिथेच eennjjooyy केल.
तिकीटांचे पूर्ण पैसे रिफंड, पाणी, चहा, पॉपकॉर्न व झिम्मा २ चे व्हाउचर (फुकट शो) असे सगळे वसुल करत 🚩🚩🚩🚩 ध्वज विजयाचा उंच धरा रे ! उंच धरा ! म्हणत आम्ही थिएटर बाहेर पडलो…….💃🚶‍♂️👩‍🦯

— लेखन : रेखा जोशी. नवी मुंबई.
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments