थोडा विचार करावा,
काय जन्माचे निमित्त,
कशासाठी जन्म झाला,
काय आहे कार्य मात्र,
कुठे आहेत लपले,
माझे खरे सवंगडी,
त्यांची सोबत सतत,
भगवंत तो नावाडी,
काही मित्र, सहकारी,
योग्य निवड, जोडावे,
सुख दुःख, त्यांच्यासवे,
थोडे वाटूनही घ्यावे,
काही कार्य सामाजिक,
समरसून करावे,
तरुणांना मार्ग सांगू,
त्यांच्या शक्तीला पोसावे,
कर्म करीतच जावे,
सुख साऱ्यांचे चिंतावे,
इतरांच्या हास्यासाठी,
जमेल ते, ते करावे,
लक्ष्य निश्चित करावे,
मार्ग योग्य निवडावा,
चित्ती घ्यावे त्याचे नाम,
दिवस हा गोड व्हावा…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800