नांदेड येथील महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथील सहशिक्षक तथा बालभारती पुण्याचे सदस्य डॉक्टर देविदास तारू यांच्या “आता मव्हं काय! ” या आत्मकथनास सर्वोत्कृष्ट तितिक्षा इंटरनॅशनल 2024 चा अत्यंत सन्मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून नऊ जून 2024 रोजी कोल्हापूर येथे अनेक दिग्गज दिग्दर्शक, कलाकारांच्या, साहित्यिक तथा, चला होऊ द्या कार्यक्रमातील कलाकारांच्या आणि राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्यामध्ये डॉक्टर तारू यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

डॉ. तारू यांना यापूर्वी सदरील आत्मकथनास दहा राज्यस्तरीय व एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. अत्यंत सन्मानाचा हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल, श्री शारदा भवन संस्थेचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री, माजी आमदार अमिताभाभी चव्हाण, डीपी सावंत माजी शिक्षण मंत्री, डॉक्टर शेंदारकर रावसाहेब, श्री नरेंद्र चव्हाण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम तसेच उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अन्य पुरस्काप्राप्त साहित्यिक
तितिक्षा इंटरनॅशनल ग्रंथपुरस्कार – २०२४ जाहीर…
सर्वाेत्कृष्ट कादंबरी : अयाेध्येची उर्मिला – डाॅ.स्मिता दातार
उत्कृष्ट कादंबरी : घट रिकामा – भ.पुं.कालवे
ललित लेखसंग्रह : अक्षरांची रांग – रामचंद्र ईकारे
लघुनिबंध संग्रह : ओढ मातीची – अरूण नवले
प्रवासवर्णन : स्कँडिनेव्हियाची नजरभेट – डाॅ.नितीन बळवल्ली
आध्यात्मिक : महत् ब्रम्ह शिंपल्यातील माणिक माेती – स्वामी स्वरूप स्वानंद

सर्वोत्कृष्ट आत्मकथन :
१. आता मव्हं काय! २. डाॅ.देविदास तारू
सर्वोत्कृष्ट कथासंग्रह :
१. शेलक्या बारा – इंद्रजित पाटील २. अनाकलनीय – प्रतिभा सराफ
उत्कृष्ट कथासंग्रह :
१. बेघर – शुभांगी मांडे-खारकर २. उसवण – लक्ष्मण दिवटे
प्रथम कथासंग्रह : मायावी – सुनील जाधव
व्दितीय कथासंग्रह : चांगभलं – संताेष पाटील
तृतीय कथासंग्रह : कुवतीची माणसं – राजेंद्र पाेतदार
विशेष प्राविण्य : बिनचेहऱ्याची माणसं – संभाजी अडगळे
बालकथा संग्रह : आभाळातील जहाज – रश्मी गुजराथी
सर्वाेत्कृष्ट काव्यसंग्रह : मातृवृक्ष – साै.हेमलता प्रदिप गिते
उत्कृष्ट काव्यसंग्रह : अभिधा – शशांक देशमुख
प्रथम काव्यसंग्रह : माणुसकीचं आभाळ – रामचंद्र ईकारे
व्दितीय काव्यसंग्रह : दिडदा दिडदा – डाॅ. आदिती
तृतीय काव्यसंग्रह : सांजवात – अशाेक भिंगार्डे
विशेष: प्राविण्य-काव्यसंग्रह, कुबेर खजिना – सुधीर कुबेर
सर्वोत्कृष्ट बाल कादंबरी : गावखेड्यातील खेळ – प्रा. शिवाजी बागल
बालकविता संगह :
प्रथम क्रमांक – बालजगत
व्दितीय क्रमांक – हसरी शाळा
नाट्यलेखन पुरस्कार :
क्रांतिवीर बाबूराव शेडमाके (तीन अंकी शाैर्य नाट्य) – चुडाराम बल्हारपुरे.
— लेखन : प्रिया दामले. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800