आजचा आनंद नोंदवून ठेवावा म्हणून हा प्रपंच…
पाण्याची आवश्यकता असलेली तहानलेली सोनसावली….
चारही बाजूंना निरव शांतता….
सोबत फक्त तारू आणि साई मध्ये ताई- ताई करत विचारांची तंद्री मोडत भानावर आणण्यासाठी….
खऱ्या अर्थाने निसर्गाच्या कुशीत…..
आजचं काम हे मनाला खूप शांती आणि आनंद देणार …..
प्रत्येक झाडाला पोटभर पाणी देताना मन भरत होतं….
गेल्या वर्षी याच दिवसात वृक्षारोपण झाल्यावर असेच एकेका झाडाला नळीने पाणी देताना चे दिवस आठवले….
मागच्या वर्षाची झाडे जणू आज मला सांगतात “आता तुझी गरज नाही” पुढच्या वर्षी ही पण अशीच भांडतील का ?
हो नक्कीच भांडतील, पण माझ्याशी ज्या गूजगोष्टी करतील त्या फक्त मलाच कळतील. ….
हे दिवस पटकन संपून जातील काही वर्षानंतर घनदाट जंगलात याचे रूपांतर होईल. मला पुन्हा या जागेत असे निवांत बसता येणार नाही पण सोनसावली आयुष्यभर माझ्या सोबत असेल.
आज सगळ्या झाडांना पाणी देऊन झाले. बऱ्याच दिवसांची अस्वस्थता कमी झाली.

यावर्षी पावसाळा लवकर संपला. डोंगरावरचे गवत सुकून गेले परंतु ही इवली इवली झाडे आपला रंग सांभाळत माझी वाट बघत विश्वासाने उभी आहेत…..
जणू मला सांगत असतात आपण जगलं पाहिजे….
— लेखन : सौ प्रभावती पाटील
संस्थापक माय माती फाउंडेशन
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800