षडाक्षरी काव्य रचना
आनंदाचे झाड
अंगणी लावले
मंत्रमुग्ध होत
जलास शिंपले
दीन दुबळ्यांना
मिठाई करून
वृक्षारोपणाने
आनंद भरून
रानमेवा आला
माझ्या अंगणात
तबक भरले
एकाच क्षणात
वृक्षाच्या छायेत
वाढतात मुलं
प्राणवायू घेता
श्वास होती खुलं
परोपकाराची
भावना शिकावी
आनंदाची मुल्य
नित्य टिकवावी
वृक्ष रोपणाने
होती वृद्धिंगत
फळं फुलं मेवा
शोभते पंगत
औषधोपचार
प्रबोधन करी
वृक्षवल्ली द्वारी
नसावी तस्करी
नानाविध वृक्ष
देती प्राणवायू
विधाता वाढवी
बालकांची आयू
निरोगी जीवन
लावा उपवन
जलधारा जना
देती संजीवन
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800