चहाचा घोट पहिला, आनंदाने घ्यावा,
आल्याच्या चवीत, जरा आनंद शोधावा,
छोट्या छोट्या आनंदांना, मुकलो का सारे ?
धावणाऱ्या, पळणाऱ्यांनो, लक्ष जरा द्या रे,
फक्त दिवस येतो जातो, जगता का कधी ?
तास संपले, प्रहर संपले, कळते का कधी ?
भावनांचा बघा वाहतो, अनिर्बंध पूर,
जरा बघा तुमचा “मी”, किती गेला दूर,
शांत मनाने, उत्साहाने, नवे करा काही,
गेलेला तो क्षण नी दिवस, पुन्हा येत नाही,
मस्त हसा मनापासून, आनंद साजरा करा,
दिसुदे साऱ्यांना, तुमचा हसरा चेहरा…!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुंदर