Thursday, January 16, 2025
Homeसाहित्यआमचा साहित्यिक ताळेबंद

आमचा साहित्यिक ताळेबंद

कॅलेंडर वर्षाच्या (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर) अखेरीस आपण वर्षभरात काय काय केले, काय काय राहिले याचा तर आर्थिक वर्ष अखेरीस, म्हणजेच ३१ मार्च रोजी आर्थिक ताळेबंद घेत असतो. पण आपले जेष्ठ लेखक सर्वश्री उध्दव भयवाळ आणि नागेश शेवाळकर या दोघांनी आपापला साहित्यिक ताळेबंद मांडून एक नवीन पायंडा पाडला आहे. या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. वाचू या त्यांचा साहित्यिक ताळेबंद…
– संपादक
१.
“वर्ष 2024 आणि मी”
“वर्ष 2024 आणि मी” या विषयी लिहिण्याचा विचार केला तेव्हा माझे मन थोडे खट्टू झाले. त्याचे कारण म्हणजे 24 मे रोजी रस्त्यावर मला झालेला पहिला अपघात आणि 24 ऑगस्ट रोजी घरात फरशीवरील पाण्यावर पाय घसरून पडलो त्यामुळे झालेले फ्रॅक्चर, पायाला बांधलेले प्लास्टर याच गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या. त्यामुळे मी जवळजवळ सहा महिने घरातच होतो. मनुष्य स्वभावच असा आहे की, वाईट गोष्टी तेवढ्या लक्षात राहतात आणि चांगल्या गोष्टी मात्र विसरल्या जातात.
आता सकारात्मक बाजू पाहू जाता, या वर्षी जुलैमध्ये मी माझ्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. पुढच्या जुलैमध्ये वयाची पंचाहत्तरी पूर्ण होईल.
अपघातांमुळे घरातच असल्यामुळे लिखाणाला भरपूर वेळ मिळाला. जवळजवळ तीस पस्तीस दिवाळी अंकाना माझे साहित्य आणि अठरा, वीस दिवाळी अंकाना माझी पत्नी सौ. निर्मला हिच्या कविता पाठविणे झाले.

आतापर्यंत हाती आलेल्या 28 दिवाळी अंकांमध्ये माझे लेख, कथा, कविता, इत्यादी साहित्य प्रकाशित झाले.
तर सोळा दिवाळी अंकामध्ये सौ. निर्मलाच्या कविता आल्या. हा आनंद नजरेआड करून चालणार नाही.
फेब्रुवारी 2024 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील एक दिवशीय मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद माझी मुलगी अंजली धानोरकर (उपजिल्हाधिकारी) हिने भूषविले.

तर “लावण्य बहार” या माझ्या अल्बमचा प्रकाशन सोहळा 27 डिसेम्बर 2022 रोजी थाटात पार पडला. त्या अल्बममधील माझी एक लावणी मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या “राजकारण गेलं मिशीत” या चित्रपटात झळकली. 21 एप्रिल 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील प्रोझोन मॉल च्या चित्रपटगृहात मकरंद अनासपुरे आणि चित्रपटाच्या टीमसोबत त्या सिनेमाचा प्रीमियर शो पाहिला. त्यानंतर सर्व कलाकारांसोबत झालेल्या फोटो शूटचा आनंद तर अवर्णनीयच.
एकंदरीत मिश्र घटनांनी भरलेले असे गेले 2024 हे वर्ष.

उद्धव भयवाळ

— लेखन : उद्धव भयवाळ. छ. संभाजीनगर

२.
माझी साहित्यदिंडी : २०२४ !
‘दिस जातील दिस येतील’ हे सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील ‘शापित’ चित्रपटातील द्वंद्व गीत मला फार आवडते. विशेषतः डिसेंबर महिना सुरू होताच हे गीत अनेकदा ओठांवर येते. विशेष म्हणजे नोव्हेंबर १९८३ यावर्षी लग्न झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात आकाशवाणीवर प्रसारित झालेल्या ‘आपली आवड’ या कार्यक्रमात मी या गाण्याची मागणी केली होती. ते गीत आमच्या दोघांच्या नावाने प्रसारित झाल्यानंतर झालेला आनंद अवर्णनीय नि अविस्मरणीय असाच…
हे आठवण्याचे कारण म्हणजे आपण २०२४ या वर्षाला निरोप द्यायला सज्ज झालो आहोत. या वर्षाचे सिंहावलोकन करताना दाटून आलेल्या आठवणी आणि विशेषतः साहित्य दिंडीचा वारकरी असल्यामुळे या वर्षी केलेली सेवा सर्वांसमोर सादर करताना आनंद होतो आहे….

२०२४ या वर्षातील प्रकाशित लेखमाला : –
१) भारतरत्नाचे मानकरी (५३ लेख) दैनिक हिंदुस्थान, अमरावती, लाईफ रिचार्ज व्हाट्सअप समूह.

२) ओळख साहित्यिकांची (५० लेख) दैनिक सत्यप्रभा,.नांदेड.

३) थोरांचा परिचय (५० लेख) (साप्ताहिक जयध्वज, यवतमाळ)

४) निवडणुकीची हास्यजत्रा (७० लेख, लोकसभा निवडणूक)

अ) दैनिक स्नेहप्रकाश, श्रीरामपूर
आ) दैनिक मराठवाडा साथी, परळी
इ) न्यूज स्टोरी टुडे, मुंबई
ई) साप्ताहिक आम्ही मुंबईकर, मुंबई
उ) दैनिक सत्यप्रभा, नांदेड
ऊ) साप्ताहिक किरात,
ए) साप्ताहिक प्रतोद, नांदेड
ऐ) साप्ताहिक न्यूज मसाला, नाशिक
ओ) साप्ताहिक विशाल विटा, सांगली
औ) दैनिक नायक, संगमनेर
अं) साप्ताहिक बार्शी जनता टाइम्स, बार्शी
अ:) साप्ताहिक लेखीसंवाद, यवतमाळ
क) सा.सायबर क्राईम संभाजीनगर
ख) साहित्य प्रसार (यू ट्यूब)

५) निवडणूक गमतीजमती (४० लेख, विधानसभा निवडणुक)
१) दैनिक श्रमिक एकजूट, नांदेड
२) दैनिक लोकसागर, अमरावती

६) पुस्तक परिचय, प्रासंगिक लेख, कथा खालीलप्रमाणे प्रकाशित ….
दैनिक सामना, दैनिक सकाळ, दैनिक हिंदुस्थान, दैनिक सत्यप्रभा, मासिक चपराक, साप्ताहिक प्रतोद, दैनिक लोकसागर, साप्ताहिक न्यूज मसाला, साप्ताहिक जयध्वज, दैनिक तरुण भारत, दैनिक महाराष्ट्र संकल्प, दैनिक महाराष्ट्र सारथी, साप्ताहिक जनमत, दैनिक सुवर्ण महाराष्ट्र, वर्ल्ड व्हिजन टाइम्स, पुस्तकप्रेमी व्हाट्सअप समूह इत्यादी.

७) पुस्तक प्रकाशन….
अ) मंत्र्याची शाळा (बालकथा संग्रह, सोहम क्रिएशन ॲंड.पब्लिकेशन, पुणे)
ब) निवडणूक एक आजार (विनोदी कथासंग्रह, शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद)

८) आगामी वर्षाची प्रकाशन तयारी…
१) प.पू. पूर्णानंद महाराज कथामृत ग्रंथ (हस्तलिखित पूर्ण)
२) डॉ. सविता बाबासाहेब आंबेडकर (चरित्र, हस्तलिखित पूर्ण)
३) आस्वादकात्मक परिचय भाग-२ ऐक्यांशी परिचय लेख.
४) बायकोची एकसष्टी, नवऱ्याची षष्ठी (विनोदी कथासंग्रह)

९) दिवाळी अंक २०२४ (महाराष्ट्र, इतर राज्य आणि विदेश)
जवळपास सत्तर दिवाळी अंकांमध्ये कथा, लेख प्रकाशित झाले आहेत.

१०) मान-सन्मान
१) ‘मोबाईल माझा गुरू’ या बालकथा संग्रहाला अमरेंद्र भास्कर अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषद, पुणे यांचे
पारितोषिक !
२) ‘स्वयंपाकाची गोष्ट’ विनोदी कथेला ‘निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेत पारितोषिक !
वरील सर्व साहित्य प्रवासात वाचक, प्रकाशक,‌ संपादक, लेखक, नातेवाईक, कुटुंबीय सर्वांच्या पसंतीला उतरले हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. सर्वांच्या प्रतिक्रिया स्फूर्तिदायी, प्रेरणादायी, उत्साहवर्धक असल्यामुळे नित्यनेमाने लिहित असतो. धन्यवाद !

नागेश शेवाळकर

— लेखन : नागेश शेवाळकर. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Sneha Shrikant Indapurkar on “जर्मन विश्व” : १
Prashant Thorat GURUKRUPA on जर्मन विश्व : २
Prashant Thorat GURUKRUPA on पुस्तक परिचय