Saturday, April 13, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : 13

आमची युरोप ट्रीप : 13

25 जून च्या रविवारी प्रशांत ना Airport वर सोडून आम्ही Sigtuna ला जावून आलो. घरी आल्यावर प्रशांत ची अनुपस्थिती जाणवत होती. त्यांचा दुबई ला पोहोचल्यावर व मुंबई ची फ्लाइट बोर्ड केल्यावर मेसेज आला. तेव्हा झोप लागली. साधारण पणे रात्री चे 12/12.30 झाले होते. चिराग सकाळी लवकर उठून ( पावणे पाच ला) आवरून जिम ला जावून 7 ला घरी आला. आवरून नाश्ता करून तो ऑफिस ला सुद्धा 7.45 ला गेला. तरी आम्ही दोघी ढाराढूर झोपलो होतो. निघताना त्यानी फक्त आम्हाला संध्याकाळी Södertälje centrum ला या, तिथून सुपर मार्केट मध्ये जावू असे सांगितले. आम्ही त्याला झोपेतच see you केले 😅.

मी त्याला आधीच सांगितले होते की पप्पा असताना आपण भरपूर हिंडलोय तर 26 ते 30 मध्ये आधी घर नीट लावून नीट साफसफाई करणार. मला त्या शिवाय करमत नव्हते. 😜😂. 30 च्या शुक्रवारी त्याच्या मित्र मैत्रिणींना रात्री जेवायला बोलवलं होते त्यामुळे काय बनवायचे ते ठरवून त्या प्रमाणे सामान आणायचे ठरवले.

26 th जून चा दिवस फक्त स्वयंपाक घर आवरण्यात गेला. मी नेलेले भाजी, नाश्ता व मसाला पॅकेट expiry डेट प्रमाणे लावून ठेवले. बाकी किचन मधल्या वस्तू पटकन लागणार्‍या व कधीतरी लागणार्‍या अश्या सॉर्ट करून ठेवल्या. नाचणी इडली च ताकात भिजवून ठेवले. मग मात्र जायचा कंटाळा आला. चिराग ला फोन करून सांगितलं की ऑफिस नंतर घरी ये. उद्या जाऊया. 😅तो घरी आल्यावर मस्त चहा बरोबर नाश्ता दिला. ऑफिस मध्ये सुट्टी नंतर काय काम चालू केले ते त्यानी सांगितले. एकत्र जेवण बनवुन गप्पा मारत जेवलो. मुलांनी भांडी घासली आणि झोपलो.

मंगळवारी 27 ला पण चिराग जिम ला जावून आवरून ऑफिस ला गेला. आम्ही दोघी मायलेकी आमचे आवरलं की परत आवरा आवरी ला लागलो. मी इथून मिनी mixer नेला होता. त्यानी तिथे इलेक्ट्रिक cooker पण घेतला होता. त्या साठी जागा केली. बेडरूम चा पसारा आवरला. दोन्ही वेळचे जेवण करून सामानाची यादी बनवून ठेवली आणि 3.45 ला Södertälje centrum ला जायला निघालो. 4.15 ला चिराग ऑफिस मधून डायरेक्ट तिकडे येवून भेटला. तिथून सुपर मार्केट मध्ये गेलो. सर्व खरेदी झाली आणि बिलिंग वेळी लक्ष्यात आले की ईश्वरीचे wrist watch हरवले आहे . तिथे सांगून ठेवले मिळाके तर कळवा. पण ईश्वरी एकदम हिरमुसली झाली. कारण तिच्या बाबतीत हे दुसर्‍यांदा झाले. आधी एकदा पुण्यात हरवलेल. चिराग तिला हसवायचा खूप प्रयत्न करत होता. घरी आल्यावर लक्ष्यात आल की ते आमच्याच सामानाच्या पिशवीत होते 😅. देवाची कृपा 😇

28 च्या बुधवारी मात्र चिराग जिम ला गेला नाही. फक्त ऑफिस ला गेला आणि तिथून डायरेक्ट स्टॉकहोम ला केस कापायला गेला. त्याच्या कडे एका सलूनचे स्टुडंट discount कार्ड होते जे 30 तारखेला संपणार होते. त्याच्या आत त्याला ते वापरायचे होते 😁. आम्ही दोघींनी त्या दिवशी आवरल्यावर आदल्या दिवशी आणलेले सामान नीट ठेवले आणि शुक्रवार साठी ची तयारी चालू केली. कोणत्या भांड्यात बनवायचं, सर्वांना ताट, वाट्या, चमचे पुरतील का ते सर्व नियोजन करून ठेवले. दुसर्‍या दिवशी आषाढी एकादशी असल्याने साबुदाणा भिजवून ठेवला 😃. त्यासाठी केवढी शोध मोहीम केली होती आमचे आम्हाला माहीत 😁. मला Berries आवडतात म्हणुन लेकानं ते व अजून फळ व दही, दूध पण आणून ठेवले होते.

29 च्या गुरुवारी चिराग नाश्ता करून ऑफिस ला गेल्यावर ईश्वरी नी नाश्त्याला नूडल्स खाल्ले आणि मी ज्यूस, सफरचंद आणि ताक असे दुपार पर्यंत घेतले. खिचडी संध्याकाळी गरम गरम बनवायची ठरवली. दिवस भर फळ आणि ताक वर काढले. ईश्वरी साठी फक्त जेवण बनवले. आणि दुसर्‍या दिवशी साठी चा मसाला भात साठी चा मसाला mixer वर बनवून ठेवला. थोडे फार तयारीचे काम करून ठेवले. संध्याकाळी गरम गरम साबुदाणा खिचडी आणि दही, फळ असे जेवण झाले. एवढ्या लांब माझा कित्येक वर्षे पाळत असलेला उपवास पाळता आला म्हणून फार भारी वाटलं 😇

खरं तर हा आठवडा जास्त करून घर लावणे, साफ सफाई अभियान व संध्याकाळी सोसायटी च्या प्रांगणात फेर्‍या मारणे असाच जास्त घालवला.

चिराग पण रोज सकाळी दूध कॉर्न फ्लेक्स, केळ व उकडलेले अंड असा नाश्ता स्वतः च करून खावून ऑफिस मध्ये जायचा. मला एक दिवस पण त्यानी उठवल नाही. जेवण पण ऑफिस कॅन्टीन मध्ये करत होता. संध्याकाळी घरी आल्यावर मात्र चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण माझ्या हातचे मिळतय ह्यातच लेकरानी समाधान मानले. मंगळवारी सांगितले की भाजी मुद्दाम जास्त बनवून ठेव म्हणजे Tortea बरोबर डब्यात नेता येईल. मग बुधवार पासून भाजी, Tortea (चपाती चा तिथला प्रकार जो सुपर मार्केट मध्ये मिळतो) न्यायला लागला.

शुक्रवारची आम्हा सर्वांची लगबग व त्याच्या मित्र मैत्रिणीं बरोबर केलेली मजा ह्या चा सविस्तर वृत्तांतासह लवकरच पुढच्या भागात भेटू यात 😊

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments