Saturday, July 27, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप :15

आमची युरोप ट्रीप :15

1 जुलै च्या शनिवारी आम्ही djurgården (इयूर गार्डन) बघायचे ठरवले. आदल्या दिवशी रात्री झोपायला जरा उशीर झाला म्हणून आरामात उठलो पण 11 पर्यंत आवरून नाश्ता करून बाहेर पडलो.

आदल्या दिवशीची खीर, खिचडी जरा नाश्त्याला खाल्ली आणि थोडी डब्यात बरोबर घेतली. तिथे गार्डन मध्ये खावू यात असं लेकानं सांगितलं. त्याला लहानपणापासून सवय आहे प्रवासात तो त्याचा खाऊ, पाण्याची बाटली सर्व बरोबर ठेवायचा 😃. विद्यार्थी म्हणून KTH ला गेला तरी सकाळी नाश्ता करून लेक्चरला किंवा
मित्रांबरोबर बाहेर भटकंती करताना पण टिफीन बरोबर घेतो 😃. चांगली सवय आहे. 😇

आम्ही Södertälje (सौदेतेलिया) हून Stockholm Centrum ला 12 वाजता पोहोचलो. तिथून पुढे बस घेऊन आम्ही गार्डन कडे जात असताना The Royal Dramatic Theatre (Kungliga Dramatiska Teatern) जवळ आमच्या समोरून येणाऱ्या ट्राम चा एक छोटा अपघात झाला म्हणुन बस ड्रायवर नी बस आहे तिथेच थांबवून ठेवली. अर्धा तास असा गेल्या वर मग बस निघाली. असं काही आम्ही तिथे पहिल्यांदा अनुभवल. असो. बडे बडे शहरोंमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है. सेनोरीटा 😃

बस मधून जाताना पण लेक आजूबाजूच्या परिसरात काय काय आहे ते सर्व दाखवत होता. Djurgården च्या आतल्या शेवटच्या स्टॉप वर उतरलो. बस मधूनच लेक Malaren च्या आजूबाजू ला हिरव्यागार झाडीने नटलेला भाग पाहून मन प्रफुल्लित झालं होतं. 😊 पुढे चालतच भटकंती सुरू केली.

थोडे पुढे गेल्या वर लेक Malaren च्या एका पुलाच्या अलीकडे आइस क्रीम खाल्ले 😋गरमी जाणवत होती. त्यामुळे ice cream खायला एक बहाणा मिळाला. 😁 पुढच्या फोटो सेशन साठी ऊर्जा हि मिळाली. 😄 शिवाय लेकाला पण नवीन कॅमेरा चा सदुपयोग करण्याची संधी मिळाली 😂. बघा एका आइस्क्रीम मुळे काय काय होवू शकते!. एक आयडिया जो बदल दे आप की दुनिया च्या टोन मध्ये एक आइस्क्रीम जो बदल दे दुनिया असं झालं आमचं 😃.

Djurgården किंवा अधिक अधिकृतपणे, कुंगलिगा जुर्गार्डन, मध्य स्टॉकहोम, स्वीडनमधील एक बेट आहे. Djurgården ऐतिहासिक इमारती आणि स्मारके, संग्रहालये, गॅलरी, मनोरंजन पार्क Gröna Lund, ओपन-एअर संग्रहालय स्कॅनसेन(इथे skansen mid summer festival होतो जो तिथे खूप प्रसिद्ध आहे), लहान निवासी क्षेत्र Djurgårdsstaden (तिथे एक शाळा पण आहे), नौका बंदर आणि जंगल आणि कुरणांच्या विस्तृत क्षेत्रांचे (जिथे गायी, घोडे चरत असतात) घर आहे. हे स्टॉकहोल्मर्सचे आवडते मनोरंजन क्षेत्र आणि पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी 10 दशलक्षाहून अधिक अभ्यागतांना आकर्षित करतात. त्यापैकी सुमारे 5 दशलक्ष संग्रहालये आणि मनोरंजन पार्कला भेट देण्यासाठी येतात.

हे बेट 1995 मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल सिटी पार्कच्या मालकीचे आहे. 15 व्या शतकापासून स्वीडिश सम्राट रॉयल ड्युर्गार्डनच्या मालकीचे आहे. आज, हा अधिकार स्वीडनच्या रॉयल कोर्टाचा एक भाग असलेल्या रॉयल जर्गर्डन प्रशासनाद्वारे वापरला जातो. Djurgårdsbrunnsviken द्वारे Djurgården पासून वेगळे केलेले शहराचे मोठे क्षेत्र म्हणजे Gärdet सह Norra Djurgården आहे. ह्याच भागात बहुतांश देशांचे दूतावास आहेत. जे आम्हाला बस मधून जाताना दिसले.

ह्या बेटाच्या आजूबाजूला असलेल्या लेक malaren (मॅलारेन) मध्ये खूप सारे लोक बोटिंग, कायाकींग, वेकबोर्डींग, स्नोरकेलिंग, सर्फिंग असे विविध वॉटर स्पोर्ट्स ची मजा घेत होते. शिवाय लेक Malaren च्या कडेच्या रस्त्यावर काही जण पळण्याचा सराव, जॉगिंग, ब्रिस्क वॉक आणि अगदी घोडेस्वारी पण करत होते. त्यामुळे रस्त्यावर मध्ये मध्ये घोड्यांच्या विष्ठा हि होत्या 😅(हे तुम्ही कधी गेलात तर मानसिक तयारी असावी म्हणून सांगते 😆) जे आमच्या सारखे रमत गमत बागडणारी लोक आहेत त्यांना माहीत असलेलं बरं 😄 काही ठिकाणी कुरणांमध्ये गायी, घोडे चरताना बघितले.

लेक Malaren च्या दोन्ही बाजूच्या रस्त्यांना जोडणारे छोटे छोटे पूल ठराविक अंतरावर आहेत. शिवाय ह्या रस्त्यांवर स्थानिक लोक त्यांच्या पाळीव कुत्र्यांना ही चालवायला घेऊन येतात. गोल्डन retriver बघितल की मी जाउन बोलून त्यांच्या परवानगीने कुत्र्याला माया करून घेतली. कारण बघितल की मला इरा ची आठवण यायची 😇

चालून दमल्यावर आम्ही एके ठिकाणी बेंचवर बसुन बरोबर आणलेला tiffin खाल्ला. व परत आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य बघत पुढे भरपूर भटकलो. नंतर बस घेऊन संग्रहालयाच्या स्टॉप वर उतरलो. तिथल्या समोरच्या बगिच्याचा भागात छान हिरवळ आणि वेगवेगळ्या फुलांची रोपे आहेत ज्यांची तिथे व्यवस्थित निगा राखली आहे. त्यामुळे तिथे फोटो काढायचे मोह आवरला नाही .😄

Djurgården मध्ये दुपारी 1 ते संध्याकाळी 6.30 पर्यंत भटकंती केली. तिथून निघायच मन करत नव्हत पण ईश्वरी ला तिच्या मैत्रिणींना द्यायला व मला जवळच्या नातेवाईकांना द्यायला भेटवस्तू घ्यायच्या होत्या. आणि Drottninggatan स्ट्रीट वर ची भेटवस्तूंची दुकाने 8/8.30 ला बंद होतात म्हणुन मग निघायची घाई केली. तिथे पोहोचायला पण बस /ट्राम नी 10/15 मिनिट लागणार होते. शिवाय 5/6 दुकान पालथी घालून व्हरायटी/किमती बघितल्या शिवाय निवड होणार नव्हती हे चिराग ला माहिती होते (आमच्या दोघींना तो चांगला ओळखतो 😆)

शिवाय भरपूर भटकंती मुळे परत भूक लागली होती. मग Drottninggatan स्ट्रीट वर एका कॅफेत मस्त खादाडी केली आणि नवीन ऊर्जे ने खरेदीच्या कामगिरीवर निघालो 😂

खरेदी झाल्यावर स्टॉकहोम Centrum जवळील सुपर मार्केट मध्ये जाऊन ईश्वरी च्या able guidance मध्ये दादाची कोरियन नूडल्स ची खरेदी झाली 😂 तो ही खुष आम्ही पण खुष 😅.

त्या खुशीतच घरी निघालो. पोहोचायला 11 वाजले. भूक पण नव्हती. दमल्यामुळे कधी एकदा झोपू असे झाले होते. प्रशांत बरोबर video कॉल वर बोलून दूध पिऊन आम्ही ताणून दिली.

दुसर्‍या दिवशी रविवारी मॉल of Scandinavia मध्ये जायला व फिरायला आधी नीट आराम घेणे गरजेचे होते. 😜😝 लवकरच भेटूयात मॉल च्या सफर मध्ये केलेल्या गमती जमती मध्ये 😊…

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८