Saturday, July 27, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : 16

आमची युरोप ट्रीप : 16

2 जुलै च्या रविवारी आमची पलटण (मी आणि मुलांची 😂) आवरून मॉल ऑफ स्कानडॅनिव्हिया कडे कूच करत निघालो. पलटण हे नाव आम्हाला चिराग समोर राहणार्‍या मराठी कुटुंबाने दिले 😅. रश्मी मला म्हणाली सुप्रिया तुझा लेक तुम्हाला भरपूर भटकंती करवतोय. तिथे फिरण्यासाठीची माहिती किंवा कुठे काय आहे हे सगळं ते पण लेकाला विचारतात 😊 मला तर वाटते तो student ambassador बरोबर तिथे जाणार्‍या भारतीय पर्यटकांना कधी व कुठे जावं ह्याचेही मार्गदर्शन करू शकेल 😃. अर्थात त्याचे पहिले प्राधान्य त्याचा जॉब बघून.

विद्यार्थी म्हणून तिथे राहताना सगळीकडे सायकल किंवा चालत हिंडल्याने त्याला भरपूर रस्ते माहीत आहेत. फक्त गूगल मॅप वर अजिबात अवलंबून नाहिये. असो 😁

आम्ही Södertälje हून Uppsala साठी ची train घेऊन Stockholm Solna स्थानकावर उतरलो. तिथे एक जीना चढून पूल ओलांडला की Mall of Scandinavia आहे जो स्थानकातून पण दिसतो.

घरातून नाश्ता करून निघाल्यामुळे तसे लगेच काही पोटोबा करायची गरज नव्हती म्हणून तिथे गेल्या गेल्या आम्ही आमचा मुख्य उद्देश म्हणजे खरेदीसाठी सज्ज झालो 😂. ईश्वरी तर खूप उत्साहात होती कारण तिला H&M मध्ये उन्हाळी सवलत विक्री योजनेमध्ये भरपूर खरेदी करायला वाव मिळाला. ज्याचा तिने पुरेपुर उपयोग केला. 😅

दादा पण तिला म्हणाला जा ईश्वरी जा, जी ले अपनी जिंदगी और कर ले मनपसंद खरीदारी 😂 फक्त तुझ्या मैत्रिणींना सांग की ये सब मुझे मेरे दादा ने दिलाया. मेरा भाई बहोत अच्छा है 😄 (त्या दोघांचे एकमेकांना चिडवणे /खोड्या काढणे हे मात्र कायम चालू असते. अगदी फोन वर सुद्धा 😅)

आधी आम्ही (मी आणि ईश्वरी नी) H&M मधला स्त्रियांसाठी चा कपडे विभाग अख्खा धुंडाळून काढला. 😂 चिराग मग म्हणाला, मी सामान घेऊन एका जागी बसतो. तुम्ही बघा. थोड्यावेळानी 😜 माझी पण धुंडाळायची सहनशक्ती संपली आणि मी लेका बरोबर स्थानापन्न होवून गप्पा मारत बसलो. 😅 तेवढ्या वेळात तिथे काम करणार्‍या एका मुलीचा ड्रेस मला आवडला म्हणुन मी तिच्या बरोबर बोलून हा कुठून घेतला हे विचारून ठेवले आणि ईश्वरी ची खरेदी झाल्यावर त्या दुकानात (Kappahl – कपहाल) मध्ये जायचे ठरवले. हा तिथला H & M पेक्षा भारी ब्रॅण्ड आहे असं लेकानं सांगितले. मला म्हणाला मम्मा, घे जीवाचे स्टॉकहोम करून 😂

त्यानंतर बर्‍याच वेळा नी ईश्वरी तिने निवडलेले कपडे चाचणी करण्यासाठी एकत्र घेऊन आली. मग आम्ही दोघी मिळून ट्रायल रूम साठी नंबर लावला. तिथे आम्हाला पुण्याच्या मायलेकी भेटल्या. मग रांगेतच आमच्या गप्पा झाल्या 😅ट्राय करून निवडून तिची खरेदी झाल्यावर आम्ही lindt च्या chocolate च्या दुकानात गेलो. हा एक स्विस चॉकलेट चा प्रीमियम ब्रॅण्ड आहे. तिथे पण भरपूर खरेदी केली. स्वतः साठी आणि देण्यासाठी पण.

तिथून मग decathlon मध्ये गेलो जिथे चिराग ला जिम जॅकेट , योगा साठीची चटई अश्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या. तिथे त्याला त्याचा VIT, वेल्लूर चा एक सीनियर त्याच्या कुटुंबीयांना घेऊन आलेला भेटला. आमची ही त्याने ओळख करून दिली. सर्वात शेवटी kappahl मध्ये मला पाहिजे तसा ड्रेस मिळाला 🕺💃

एवढी खरेदी करताना हिंडून दमल्यामुळे 😂 जब्बरदस्त भूक लागलेली. मग लगेच मॅक्स बर्गर मध्ये घुसलो. रविवार असल्याने गर्दी भरपूर होती पण आम्ही नेहमीच्या शिताफीने (मुंबईतील गर्दी मध्ये जागा पकडायची सवय कामी आली 😁) पटकन एक टेबल पकडून सामान खुर्च्यांवर ठेवून मी सामानाची राखण करत बसले आणि पोरं ऑर्डर द्यायला गेली ✌️

मनसोक्त पोटोबा झाल्यावर आम्हाला लक्षात आले की आता lappis (लापीस) ला जिथे चिराग student accommodation मध्ये आधी रहात होता तिथे जायला वेळ मिळणार नाही. कारण आधीच उशीर झाला होता. 7 वाजले. मग तिकडे जायच रद्द करून थोड फोटो सेशन करून (शास्त्र असतय ते 😃) 7.30 ला Solna स्थानकातून Södertälje ची ट्रेन घेऊन घरी निघालो.

घरी पोहोचायला 9/9.15 झाले. खादाडी झाल्यामुळे भूक तर नव्हती. मग ह्यांच्याशी बोलून चिराग नी दुसर्‍या दिवशी ची ऑफिस ची तयारी करून थोड्या वेळ गप्पा मारून ताणून दिली.

पुढच्या आठवड्यात परत निघायची तयारी, लेकाला माझ्या हातचे काय काय करून खाऊ घालता येईल त्याची योजना आणि अर्थात अजून कुठे भटकता येईल ते सर्व सांगायला पुढील वर्णनात लवकरच भेटूयात. तो पर्यंत मस्त व स्वस्थ रहा 😇

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८