Saturday, July 20, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : 17

आमची युरोप ट्रीप : 17

13 जून ते 2 जुलै भरपूर भटकंती आणि खरेदी झाली होती. आता परतीचे वेध लागले होते. आमची 8 जुलै ला परतीची फ्लाइट होती. तरीही तिथे असणाऱ्या शेवटच्या आठवडय़ात लेकाला IKEA चे तिथले सर्वात मोठे फर्निचर शोरूम दाखवायचे होते. ते तर त्यानी must visit लिस्ट मध्ये ठेवले होते. ते आम्ही बुधवारी बघायचे ठरवले.

सोमवारी ऑफिस मधून आल्यावर ईश्वरी ला घेवून सुपर मार्केट मध्ये जावुन आला. मंगळवारी संध्याकाळी दोघेही spiderman ही movie बघायला गेले. अगदी spiderman चे चित्र प्रिंट असलेले T शर्ट घालून 😄. लेकाला खाऊ घालण्यासाठी एक दिवस millet खिचडी आणि एक दिवस नाचणी ची इडली सांबार आणि चटणी बनवली.

बुधवारी 4 वाजता आमचे Södertälje सेंट्रल ला भेटायचे ठरले. लेक ऑफिस मधून डायरेक्ट तिथे येवून थांबला. तिथून आम्ही दुसरी बस घेऊन Kungens Kurva in Skärholmen ( कुंगेन्स कुर्वा, स्कारहोलमन) इथे गेलो. Ikea हि swedish कंपनी आहे. आम्ही गेलो ते store 1965 साली लोकांसाठी खुले झाले होते.

IKEA कंपनी ज्यांनी स्थापन केली त्यांचे नाव Ingvar Kamprad व त्यांनी ही कंपनी 1943 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी स्थापन केली. आधी ते फक्त पेन आणि वॉलेट विकायचे. त्यांची होम county småland ही तेथील खूप दाट जंगल असलेली खडकाळ जमीन आहे. त्यामुळे तिथल्या त्यांच्या कठिण परिस्थिती मुळे तेथील लोकांना आहे त्यात सर्व कसे भागवता येईल हे बघण्याची quality develope झाली आहे. आणि हे सर्व आपण IKEA च्या products मध्ये पण बघू शकतो.

Ingvar ह्यांच्या वडिलांनी त्यांना शाळेत चांगली प्रगती केली म्हणून बक्षीस म्हणून काही रक्कम दिली ज्यातून त्यांनी हि कंपनी सुरू केली. खरेच त्यांच्या उद्योजकतेचे कौतुक वाटते. 1948 साली त्यांनी फर्निचर बनवायला चालू केले.
त्यांचे नाव Ingvar Kamprad, Elmtaryd हे फार्म जिथे ते वाढले व Agunnaryd हे जवळील गाव ह्यांच्या आद्याक्षरे वापरून कंपनीचे नाव ठेवले. सुरवातीला फर्निचर बनवून ते ऑर्डर प्रमाणे पाठवताना ट्रान्सपोर्ट मध्ये येणार्‍या प्रॉब्लेम मुळे त्यांनी flatpack पद्धत चालू केली. म्हणजे त्या ठिकाणी नेल्यावर जोडायचे.
त्यांनी क्वालिटी व किम्मत ह्या दोन्ही गोष्टी वर भर दिला. त्या बरोबर multi function व टिकाऊ product बनवण्या वर भर दिला. शिवाय कमी जागेत ते फिट होण्यासाठी innovative आयडिया वापरल्या. त्यामुळे ते हळू हळू जग भर प्रसिद्ध झाले. त्यांनी त्यांचा लोगो बनवला. व जगभरात IKEA चे शो रूम झाले. फिलिपिन्स मधील मनिला येथे त्यांचे जगातील सर्वात मोठे शो रूम आहे.

Ingvar Kamprad यांनी ownership structure असे काही ठेवले की ज्यात काम करताना टोटल स्वायत्तता व उद्योगाच्या दृष्टीने दूरदृष्टी ह्यांची काळजी घेतली. त्यांनी ownership व IKEA हा brand (व्यापारी चिन्ह) ह्या दोन्ही गोष्टी retail ऑपरेशन आणि franchise सिस्टम पासून वेगळे ठेवले. (very impressive thought, I must say 🧏‍♂️) त्यांनी 1960 मध्ये सुरवातीला खरेदी करायला येणार्‍या लोकांसाठी IKEA स्टोअर मध्ये कॉफी व काही डिशेस ज्या आधी बनवून ठेवल्या जात ऑफर केल्या. नंतर मायक्रोवेव्ह ओव्हन तेथील किचन मध्ये include करून गरम नाश्ता हि serve करायला लागले. IKEA किचन चे meatballs sweden मध्ये प्रसिद्ध आहेत. काळा प्रमाणे त्यांनी veg balls देखील introduce केले आहेत.

चिराग नी आम्हाला सर्व मजल्यावरील सेक्शन जसे की किचन फर्निचर , बेडरूम फर्निचर, हॉल फर्निचर, बाथरूम फर्निचर शिवाय furnishings (पडदे, कार्पेट इत्यादी) विभाग दाखवले. त्याला गरज लागणार्‍या वस्तू खरेदी झाल्यावर आम्ही तिथल्या रेस्तराँ मध्ये तिथल्या प्रसिद्ध डिश चा आस्वाद घेतला 😃.

तिथे बिलिंग पण स्वतःच कोड स्कॅन करून करावं लागतं. ते झाल्यावर सामान सांभाळत आमची पलटण बस स्टॉप कडे निघाली 😂 (मनात झालं बाबा एकदाच IKEA बघून असा भाव होता 🤣)

तिथे गप्पा मारत असताना आम्हाला पुण्याचे मराठी जोडपे भेटले. त्यांच्या बरोबर गप्पा मारत आमचा परतीचा प्रवास मस्त झाला. 😇 शिवाय गप्पा मारताना लेकाला घरच्या जेवणाची आठवण आली की तुमच्या कडे येईल असेही हक्काने सांगून ठेवले 😆. म्हणजे समोरच मराठी कुटुंब आणि हे अजून एक अशी दोन घरी त्याला महाराष्ट्रीयन पद्धती च्या जेवणाची सोय करून ठेवली 😄. शिवाय त्यांनी त्याला तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या ग्रुप मध्ये पण ऍड केले.चिराग मला म्हणतो कसा, मम्मा मी एकटा एवढा हिंडलो पण मला का अशी लोक भेटले नाही ? तू असताना मात्र स्वतः हून गप्पा मारायला येतात हे म्हणजे भारीच की 😁. म्हटलं मग तुझ्या आई चा aura च तसा आहे. अजून काही दिवस थांबले तर स्विडीश लोकं पण येतील गप्पा मारायला माझ्याकडे 😂. असो 🤪

असेच हसत रहा. खुश रहा. परत भेटूयात पुढच्या भागातील म्हणजे गुरुवार व शुक्रवार च्या आमच्या भारतात परत यायच्या तयारी मधल्या लगबगीत. 😊
क्रमशः

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments