मागील भागात आपण 3, 4 व 5 जुलै ची सफर अनुभवली. आता परतीचा दिवस शनिवार 8 जुलै असल्याने गुरुवार व शुक्रवारी (6 व 7 जुलै ला) लाँड्री व सामान पॅकिंग मध्ये वेळ गेला. शिवाय शनिवारी दुपारी फ्लाइट असल्याने नाश्ता तिघांना व जेवणाचा डबा आमच्या दोघींना बरोबर घ्यायचे ठरलेले.
चिराग आम्हाला airport वर सोडवून त्याच्या मित्रांबरोबर जेवायला जाणार होता. म्हणून मग डब्याची तयारीही शुक्रवारी संध्याकाळी जेवणाबरोबर करून ठेवली.
सामानाचे वजन हि चेक करून ठेवले. तसे आम्ही आमचे काही सामान प्रशांत बरोबर पाठवले होते. आणि नवीन खरेदी केलेली व souvenirs आमच्याकडे होते. म्हणुन एकदा airline च्या नियमानुसार खात्री करून घेतली.
तसा आमचा व्हिसा 23 rd जुलै पर्यंत valid होता. ईश्वरीचे कॉलेज हि 31 जुलै ला चालू होणार होते आणि प्रशांत हि कामा निमित्ताने IIM अहमदाबाद व नंतर अझरबैजान ची राजधानी बाकू येथे जाणार असल्याने आम्ही tickets postpone करावी ह्यासाठी चिराग खूप पाठीमागे लागला होता 😅 पण ईश्वरी ला कधी एकदा मुंबईला जातो असे झाले होते. 😄 आणि मला इरा (My fur baby 😘🐶) ची आठवण येत होती 😃 तिचा वाढदिवस आम्हाला 10 जुलै ला साजरा करायचा होता म्हणुन त्याप्रमाणे आम्ही आधी tickets book केले होते 😊
गुरुवारी संकष्टी चतुर्थी असल्याने सकाळी नाश्त्याला साबुदाणा खिचडी बनवली 😜 फळेही होतीच. संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक केला. अगदी मोदक पण बनवले 😄. त्यासाठी लेकाला dessicated खोबरे आणायला आधीच सांगितले होते. गूळ घरी होताच (जेव्हा त्याच्या मित्रां साठी दलिया खीर बनवली तेव्हा आणून ठेवलेला) सकाळी तो ऑफिस ला गेल्यावर सारण बनवुन भाजी पोळी वरण भात बनवून ठेवले. म्हणजे ईश्वरी ला दुपारी जेवण व आम्हा सर्वांना संध्याकाळी होईल असे. संध्याकाळी मोदक बनवून आरती करून नैवेद्य दाखवून उपवास सोडला. चिराग ला दिड वर्षा नंतर मोदक खायला मिळाले म्हणुन खुश झाला. दुसर्या दिवशी कंपनी मधल्या एका मित्रा साठी थोडे घेऊन गेला 😄. त्याच्या मित्राने त्याला सांगून ठेवलेले की आठवणीनी मोदक आण म्हणून 😊
समोरच्या रश्मी नी शुक्रवारी संध्याकाळी चहा नाश्त्यासाठी बोलवलं होते. तिनी मिक्स भजी चा बेत ठेवला होता. तिथे रुद्र (तिचा मुलगा) बरोबर गप्पा मारायला मज्जा आली. फार गोड मुलगा आहे. रश्मी आणि प्रसाद बरोबर पण भरपूर गप्पा झाल्या. मग घरी येऊन दुसर्या दिवशी चा नाश्ता आणि जेवण बनवून टिफीन पॅक करून ठेवला. तसा नाश्ता झाल्याने विशेष भूक नव्हती म्हणुन थोडसं खाल्ल.
दुसर्या दिवशी च्या प्रवासातले कपडे, जॅकेट व इतर गरजेचे सामान वर काढून बॅग्स लॉक करून ठेवल्या. केबिन baggage पण एकदा चेक केले. तोपर्यंत चिराग नी Emirate च्या साइट वर ऑनलाईन चेक इन केले म्हणजे दुसर्या दिवशी काऊंटर वर चेक इन लगेज द्यायला रांगेत उभं रहायचा वेळ वाचणार होता.
झोपायच्या आधी चिराग नी डोक्याला तेल मालीश करून घेतली 😅 मला म्हणाला मम्मा, तुझ्या हाताने हेड मसाज हे सुख आता परत भेटल्यावरच मिळेल. लेकाचे बोलणे ऐकून जरा भावनाविवश झाले खरं 😇 मग गप्पा मारत हेड मसाज केला.
त्याला तब्येतीची काळजी घेऊन रहा म्हणून सांगून झाले. मनात मूल किती पटापट मोठी झाली ह्याचा फ्लॅशबॅक चालू होता. 🥰 गप्पा मारताना दोघांच्या लहानपणी च्या गमतीजमतींना उजाळा दिला 😍. त्याच बरोबर दोघेही स्वतः च्या करियर साठी मेहनत घेत आहेत व मम्मा, पप्पांच्या मेहनती ची त्यांना जाणीव आहे ह्या भावनेने मन सुखावले होते. 😇 देव दोघांनाही सुखी, समाधानी, धन धान्याने समृद्ध व निरोगी ठेवो हि प्रार्थना 😊🙏
आणि ह्याच सुखमय विचारात छान झोप लागली 😴. लवकरच शनिवारी 8 जुलै च्या परतीच्या प्रवासात भेटूयात 😇
क्रमशः
— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
खूप सुंदर… आमचा पण प्रवास झाला तुमच्या सोबत.. असाच प्रवास करत रहा आणि अनुभव लिहीत रहा