Friday, July 26, 2024
Homeपर्यटनआमची युरोप ट्रीप : १९

आमची युरोप ट्रीप : १९

8 जुलै च्या शनिवारी आम्ही तिघेही सकाळी वेळेवर उठून 8.45 ला तयार झालो. नाश्ता घरी करुन जेवणाचा डबा बरोबर घेऊन 9:05 ला घर लॉक करून निघालो. 9:10 ला जवळच्या बस स्टॉप वरून Soudeteljia Centrum साठी बस होती. आपल्या सारखें टॅक्सी करून जाणे तिथे तसे एव्हढे affordable नसते. शिवाय public transport छान आहे पण रविवारी बस व ट्रेन ची frequency कमी असते. त्यामुळे जरा लवकरच निघालो होतो. कारण प्रशांत ला airport ला सोडवण्यासाठी जाताना आमची बस चुकली आणि त्यानंतर एक ट्रेन पण मिस झाली होती. 😅 जरा धावपळ झाली पण अनुभवातून शिकलो 😄

Centrum ला वेळे वर पोहोचल्यामुळे पुढचे ट्रेन चे कनेक्शन पण लगेच मिळाले. आमच्याकडे 2 मोठ्या चेक ईन करायच्या बॅग्स व एक सॅक व पर्स, चिराग च्या सॅक मध्ये आमचा जेवणाचा डबा व पाण्याची बाटली इतके सामान असूनही आरामात पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये प्रवास करता येत होता.

आम्ही Uppsala ची ट्रेन घेऊन Märsta Centrum (मार्स्ता) स्टेशन वर उतरलो तेव्हा 11 वाजलेले. तिथून Railway line व रस्ता क्रॉस करून गेले की लगेच बस स्टॉप आहे जिथून Arlanada airport साठी च्या बस मिळतात. आम्हाला 10 मिनिटात लगेच बस मिळाली. त्यामुळे आम्ही 11:30 ला Airport वर पोहोचलो.

वेब चेक ईन केले असल्याने चेक ईन baggage द्यायला रांगेत थांबावे लागले नाही. बोर्डिंग पास घेऊन चेक ईन काऊंटर च्या समोरच्या बाजूला असलेल्या seating area मध्ये गप्पा मारत बसलो. 3.30 ची फ्लाइट असल्याने 12:30 पर्यंत वेळ होता. खरे तर खायची इच्छा नव्हती पण चिराग म्हणाला तुम्ही immigration साठी आत जायच्या आधी एकत्र थोडे खाऊया. मग फ्रेश होऊन Airport वर एक निघायच्या आधीच फोटो सेशन केल 😅

प्रशांत चा पण तेवढ्यात video कॉल आला. त्याच्या व लेकाच्या सूचना चालू होत्या 😂. आम्ही दोघी (मी आणि ईश्वरी) पहिल्यांदाच प्रशांत आणि चिराग शिवाय इंटरनॅशनल प्रवास करणार म्हणून त्या दोघांना जरा concern वाटत होता. 😊 ईश्वरी मात्र एकदम confident होती. म्हणाली Pappa don’t worry. तुमच्या बायकोला व्यवस्थित घेऊन येते 🤦‍♀️🤣🤣. ते पण म्हणाले माझ्या लेकीची पण काळजी घे. तिला पण नीट आण. 😄😄

आम्ही via दुबई येणार असल्याने stockholm ते दुबई व दुबई ते मुंबई असे प्रत्येकी 2 बोर्डिंग पास होते. दुबई ते मुंबई वाले बोर्डिंग पास नीट आत ठेवून stockholm ते दुबई वाले बोर्डिंग पास handy ठेवले.

चिराग ला छान हसत निरोप देऊन आम्ही आत गेलो. Security चेक झाले. तिथल्या इमिग्रेशन ऑफिसर आमच्या दोघींना बघून विचारत होता, Are you family? You don’t look same. I told him, she is my daughter. She looks like her father. Generally मी observe केलय की immigration officers कागदपत्र check करे पर्यंत गप्पा मारतात. Just a light hearted talk.

तिथून पुढे आम्ही आमच्या बोर्डिंग गेट जवळ जाऊन बसलो. तोपर्यंत 1.30 झाले होते. आम्ही बोर्डिंग गेट जवळ पोहोचल्याचे लेकाला कळवले. त्यानी आम्हाला लोकल सिम दिले होते. शिवाय airport वर च फ्री WiFi वापरून boarding होईपर्यंत time pass केला 😁. Boarding एक तास उशीरा झाले. आम्ही आमच्या सीट वर बसल्यावर पण फोटो काढले 😝

दुबई पर्यंत चा प्रवास जवळ जवळ 7 तासांचा आहे. इमिरातची फ्लाइट असल्याने हिंदी चित्रपट बघायचा ऑप्शन आहे. सुई धागा आणि जयेश भाई जोरदार हे दोन movie 4 तासात बघून झाले 😜. त्या बरोबर खान पान पण झाले. मग जरा वेळ झोपलो. दुबई ला लॅण्ड होण्याची फ्लाइट announcement झाल्यावर जाग आली. तिथे उतरल्यावर Airport च्या फ्री WiFi ला connect करून आधी प्रशांत आणि चिराग ला मेसेज केला.

दुबई airport वर च्या formalities (security check व immigration) आटोपून आम्ही दोघी मुंबई च्या फ्लाइट च्या गेट कडे गेलो. त्यासाठी आम्हाला 1.30 ते 2 km चालावे लागले. Terminal वेगळे होते. पण आम्ही आधी पण 3 वेळा दुबई airport वरून ( मे 2010, मे 2011, जून 2023 मध्ये) गेलो असल्याने तसे काही अवघड नाही हे माहीत होते.

मुंबई ची फ्लाइट असल्याने आजूबाजूला सगळे मराठी बोलणारे लोक होते. आमचा तेवढ्या वेळा मध्ये एकट्या प्रवास करणार्‍या काही लेडिज चा तिथे ग्रुप पण बनला 😅मस्त गप्पा मारत वेळ गेला 😄. फ्लाइट वेळेवर बोर्ड केली आणि प्रशांत, चिराग ला परत एकदा तसा मेसेज केला. आणि मस्त ताणून दिली. ते डायरेक्ट मुंबई ला लॅण्ड केल्यावरच जाग आली.

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल टर्मिनल वर आपले स्वागत आहे अशी घोषणा विमानात ऐकून इतके भारी वाटलं ना 😃. एकदम नाचावे असेच वाटले😆💃 Airport वर च्या formalities पूर्ण करून कधी एकदा घरी जाईन असे झाले होते. इमिग्रेशन, कस्टम क्लिअर करून baggage घेऊन टॅक्सी बूक केली. घरी आल्यावर दोघांना कळवले आणि फ्रेश होऊन इरा ला डॉग होस्टेल वरून घरी आणले. बिचारी महिनाभर आमच्या शिवाय होती. कधी तिला भेटेन असे झाले होते 😊. आम्हाला बघून ती पण खूप खुश झाली. Selfless love 😇

इति साठा उत्तरी आमची युरोप ट्रीप कहाणी सुफळ संपूर्ण झाली 😃

आपल्या इथल्या व तिथल्या एकंदर परिस्थिती विषयी पुढील शेवटच्या भागात सविस्तर लिहीनच. तोपर्यंत मस्त व स्वस्थ्य रहा 😇

— लेखन : सुप्रिया सगरे. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८