Wednesday, January 15, 2025
Homeसाहित्य"आम्ही अधिकारी झालो" : छान स्वागत

“आम्ही अधिकारी झालो” : छान स्वागत

नमस्कार मंडळी.
आपल्या वेबपोर्टल चे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “आम्ही अधिकारी झालो” हे विविध अधिकाऱ्यांच्या यशकथा असलेले पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकावर आपल्या वेबपोर्टलच्या निर्मात्या, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या प्रकाशिका सौ अलका भुजबळ यांनी लिहिलेला ‘एक दृष्टीक्षेप‘ हा पुस्तकातील नायक नायिकांचा संक्षिप्त परिचय खुप वाचकांना आवडला. त्यामुळे या पुस्तकाचे छान स्वागत होईल, असा विश्वास वाटतो. या पुस्तकाच्या आगाऊ नोंदणीसाठी वाचकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आपण अजूनही प्रकाशन पूर्व सवलतीचा लाभ घेतला नसल्यास कृपया अवश्य लाभ घ्यावा.

वाचकांच्या निवडक स्वागतपर प्रतिक्रिया पुढे देत आहोत.

१. अतिशय उत्तम माहिती देणारे आणि नव तरुण, तरुणींना अभ्यासास उपयुक्त मार्गदर्शक पुस्तक लेखक व संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या “आम्ही अधिकारी झालो – एक दृष्टिटक्षेप” या पुस्तकाबद्दल मनापासून अभिनंदन आणि हे सर्वांग सुंदर, आकर्षक पुस्तक सौ.अलकाताई भुजबळ यांनी प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुस्तकातील सर्व व्यक्तीरेखांना त्यांच्या उज्ज्वल सुयशाबद्दलही मन:पूर्वक कृतज्ञतेचा नमस्कार ! सलाम, !!..
– सुधाकर तोरणे.
निवृत्त माहिती संचालक, महाराष्ट्र शासन, नासिक.

२. “स्वप्नं पाहणे आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी अखंड पाठपुरावा करत राहणे यापासून माणसाला कोणीही रोखू शकत नाही ! “हा संदेश बोलक्या उदाहरणांनी घालून देणारे ‘आम्ही अधिकारी झालो’ हे पुस्तक सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील… देवेंद्र भुजबळ, अलका भुजबळ यांचे अभिनंदन आणि लेखक/प्रकाशक म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा !
– प्रल्हाद जाधव. लेखक, नाटककार,
निवृत्त माहिती संचालक, मुंबई

३. सन्मा अलकाताई भुजबळ मॅडम तथा श्री भुजबळ साहेब,
आपल्या सकस लेखणीतून सर्वंकषपणे लिहिलेल्या, “आम्ही अधिकारी झालो – एक दृष्टिक्षेप” समाजातील विविध स्तरातील व आपल्या कुटुंबाच्या अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत जी मुलेमुली विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून “यशवंत होऊन अजिंक्यवीर” झाले अशा विविध क्षेत्रातील ३५ जिगरबाज अधिका-यांच्या यशोगाथांचा लेखाजोखा आपल्या “आम्ही अधिकारी झालो” या मौलिक पुस्तकातून त्यांच्या संघर्षमय प्रवासाचा प्रेरणादायी आढावा घेतला आहे.

सदर पुस्तक येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी व दीपस्तंभ ठरेल असा विश्वास वाटतो. आपल्या चौकस विचाराला आणि सामाजिक बांधिलकीला साष्टांग दंडवत !!
आपले मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!
आपला स्नेहांकित,
— राजाराम जाधव.
निवृत्त सह सचिव, नवी मुंबई
.

४. हे खूप मोठं काम आहे सर हे तुमचं आणि अलकाताईंचं.
प्रतिकूल परिस्थितीत असणाऱ्या विद्यार्थांना खूप प्रेरणा मिळणार आहे यातून. लक्षात येतं की यासाठी किती परिश्रम घेतले आहेत आपण दोघांनी ते.
आ. देवेंद्र सर, आ. अलकाताई मनःपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा आणि तुमच्या धडपडीला सलाम !
— स्नेहलता झरकर अंदुरे. धाराशिव

५. “आम्ही अधिकारी झालो” देवेंद्रजी हार्दिक अभिनंदन व
मनःपूर्वक शुभेच्छा !
— प्रा डॉ लक्ष्मण शिवणेकर. शिक्षणतज्ञ, मुंबई.

६. मा. देवेंद्रजी भुजबळ सर, सर्वप्रथम तुमच्या आगामी साहित्यकृतीसाठी तुम्हाला बक्कळ शुभेच्छा.
काट्याकुट्यांच्या पायवाटेतून ध्येयप्राप्तीच्या दिशेनं मार्गक्रमण करताना ‘आत्मविश्वास’ हा अत्यंत महत्वाचा असतो. हा प्रवास व्यक्तिपरत्वे बदलतो. अशा जिद्दी, चिकाटी वृत्तीच्या हिरे-माणकांना तुम्ही ‘आम्ही अधिकारी झालो’ या गुंफमाळेत कौशल्यपूर्ण पद्धतीने गुंफल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचा हा प्रवास आम्हा वाचकांसाठी तितकाचं प्रेयणादायी ठरेल, अशी आशा आहे. स्वबळावरती उभी केलेली इमारत कोसळून पडण्याची भिती कधीच नसते. स्वअस्तित्व स्वतःच्या मेहनतीनं निर्माण करणं, ह्यात खरा ‘सन्मान’ दडलेला आहे. सदर साहित्यकृती वाचनीय असेल यात शंका नाही. आम्हाला सातासमुद्रापारंही ती लवकरंच वाचण्याची संधी मिळो. धन्यवाद.
— प्रियांका शिंदे जगताप. कॅनडा.

७. नमस्कार सर,
तुमची “आम्ही अधिकारी झालो!” ही लेखनसंपत्ती हातात आली, आणि तुमच्या विषयीचा आदर अधिकच वाढला. तुम्ही स्वतः लेखन व संपादन केलेले हे पुस्तक विकत घेऊन वाचनाची अतिशय उत्सुकता निर्माण झाली आहे. तुमचा जीवनप्रवास सुद्धा त्यामधून वाचायला मिळेल, ही अधिकच आनंददायक गोष्ट आहे. पुस्तक वाचून नंतर अभिप्राय देईनच. सध्या पुस्तक विकत घेण्याची काय प्रक्रिया आहे, ते जरूर कळवावे, हीच विनंती.
— मृदुला राजे. जमशेदपूर

८. सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बहुतेक सर्वांचेच असते. परंतू त्यांचे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही .त्यासाठी लागते एकाग्रता, मेहनत, जिद्द आणि प्रेरणा !
देवेंद्र भुजबळ यांच्या प्रकाशित होण्याऱ्या आगामी पुस्तकामुळे ही उणीव भरुन निघेल यात शंका नाही.
अधिकारी होण्यासाठी लागणारी प्रेरणा तर मिळेलच परंतू अधिकारी झालेल्या व्यक्तीमत्व कसे आहे व होते हेही या पुस्तकातून अनुभवता येईल !
पुस्तकाच्या प्रती अपुऱ्या पडतील व अनेक आवृत्या काढाव्या लागतील, भुजबळ साहेब व त्यांच्या धर्मपत्नी यांचे अभिनंदन !
— विजय पवार.
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक
.

९. ‘आम्ही अधिकारी झालो’ आजच्या नवयुवकांना खूप प्रेरणादायी, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर आपली स्वप्नं नक्कीच खरे होऊ शकतात.
जगाला प्रेरणा देणाऱ्या सामान्यातून असामान्य कतृत्व घडवणाऱ्या माणसांच्या जीवन संघर्षाचे संकलन नव्या पिढीला घडविणारा सुंदर ग्रंथ आहे. शुभेच्छा आणि अभिनंदन
— अनंत धनसरे.
पत्रकार, कवी, साहित्यिक. मुंबई
.

१०. ‘आम्ही अधिकारी झालो’ प्रेरणादायी प्रवास असणाऱ्या सामान्यव्यक्तीचा असामान्य जीवन प्रवास उलगडून दाखविणाऱ्या “एक दृष्टीक्षेप” चे मनापासून अभिनंदन.
— प्रतिभा पिटके. अमरावती.

११. सर, “आम्ही अधिकारी झालो” excellent” यांतील पहिले दोन अधिकारी नीला सत्यनारायण आणि जी. श्रीकांत यांच्याशी विशेष परिचय आहे. नीलाताईंशी तर कौटुंबिक नातं होतं. त्या गृहखात्याच्या सचिव असतांना त्यांनी माझ्या वडिलांच्या नांवाचा प्रस्ताव पद्म पुरस्कारासाठी केंद्राकडे दोन वेळा पाठवला होता. पण त्यांना यश आले नाही. नीलाताईंची “नियती” ही लघुकथा आमच्या “शलाका” या पारितोषिक प्राप्त कथांच्या संग्रहात आहे.
दुसरे जी. श्रीकांत हे लातूरचे जिल्हाधिकारी होते तेंव्हा एका कार्यक्रमांत त्यांनी तिकीट कलेक्टर ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर या त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगितली होती.
पुस्तक खूपच छान आहे. १२ जानेवारीच्या युवा दिनाच्या कार्यक्रमात वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना देता येईल. माझ्यासाठी १० कॉपी बुक करून ठेवा.
— आशा कुळकर्णी. मुंबई.

१२. नमस्कार, “आम्ही अधिकारी झालो ” ह्या आपल्या पुस्तकाचा शालेय शिक्षणात अवांतर वाचना साठी समावेश व्हावा असे वाटते . प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरेल. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा अशी इच्छा, शुभेच्छा देत आहे.
सुलभा गुप्ते. पुणे. ह. मु. इजिप्त.

— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. हे पुस्तक नक्कीच वाचनीय व प्रेरणादायी असणार यात शंकाच नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments