“आम्ही अधिकारी झालो” हे पुस्तक युवक, युवती यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल तसेच सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते, हे ही या पुस्तकाद्वारे कळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री रमेश बैस यांनी “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे लोकार्पण प्रसंगी व्यक्त केला.
राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते “आम्ही अधिकारी झालो” या पुस्तकाचे मुंबईतील राजभवन येथे नुकतेच लोकार्पण करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक – संपादक श्री देवेंद्र भुजबळ, न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन च्या सौ अलका भुजबळ, न्युज स्टोरी टुडे टीम चे सदस्य श्री अतुल सोनवणे, एम टेक हे उपस्थित होते.
पुस्तकाचे लोकार्पण झाल्यानंतर राज्यपालांनी पुस्तकाविषयी अतिशय औछ्युक्याने माहिती घेतली. ही माहिती देताना श्री देवेंद्र भुजबळ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अधिकारी झालेल्या आणि अधिकारी झाल्यानंतर लोकाभिमुख आणि कार्यक्षमपणे सेवा बजाविलेल्या व बजावित असलेल्या विविध अधिकाऱ्यांची माहिती दिली.
सर्व माहिती ऐकल्यावर राज्यपालांनी हे पुस्तक युवक, युवती यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल तसेच सर्व सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध विभागांचे कामकाज कसे चालते, हे ही कळेल, असा विश्वास व्यक्त केला.यावेळी राज्यपालांनी त्यांच्या आयुष्यातील ही विविध अविस्मरणीय अनुभव कथन केले.
पुस्तक परिचय
या पुस्तकात ३५ अधिकाऱ्यांच्या यशकथा समाविष्ट आहेत. अमीट नीला सत्यनारायण, दोन सख्खे भाऊ झाले आय ए एस, विदर्भ कन्या झाली आय ए एस, तिकीट कलेक्टर टू डिस्ट्रिक्ट कलेक्टर, आईने घडविल्या आय ए एस मुली, दारू विकणारीचा मुलगा झाला आय ए एस, मजुराची मुलगी झाली आय ए एस, लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी,
ग्रामकन्या ते आयपीएस, शुभम आयपीएस झालाच, आशिष चं यश, आधी आय आय टी मग आय ए एस, कॅन्टीनबॉय ते जॉईंट सेक्रेटरी, डेअरीबॉय ते सह विक्रीकर आयुक्त, दहावी नापास ते माहिती संचालक, वॉर्डबॉय झाला पशू संवर्धन अधिकारी, आई झाली अधिकारी, सून आधी झाली फौजदार मग झाली तहसीलदार, बिच्छु टेकडी ते दिल्ली, दृष्टिहीन झाली बँक अधिकारी,पोरकी पोर झाली अधिकारी, भिकारी झाला अधिकारी, फर्ग्युसनचे सप्तर्षी, दीपस्तंभ चे नवरत्न, ग्रुप कॅप्टन सुधीर निंभोरकर, लेफ्टनंट कर्नल महेंद्र सासवडे, नौसैनिक ते समाजसेवक, प्लॅन बी ने तरलो, मराठीने समृद्ध केले, जेल सुधरविणारा अधिकारी, खेळता खेळता अधिकारी, संघर्षातून झाली अधिकारी, मी पोलीस अधिकारी झाले, सेल्सगर्ल ते माहिती अधिकारी, आनंदी पापाजी अशा एकाहून एक अचंभित करणाऱ्या प्रेरणादायी यशकथा आहेत.
सरकारी अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या युवक – युवतींनी आणि त्यांच्या आईवडिलांनी तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे पण विविध सरकारी खात्यांचे अधिकारी नेमके काय काम करीत असतात, हे जाणून घेण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे आहे.
— टीम एन एस टी.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
नमस्कार अलका आणि देवेंद्र भुजबळ,
आपल्याला पोर्टलवर सहज आलो असताना आपल्या आम्ही अधिकारी झालो पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री रमेश बैंन्स यांच्या हस्ते झाल्याचे फोटो आणि बातमी वाचली. छान वाटले. तरुण पिढीच्या हातात देशाचे भवितव्य जाताना या सारखे दीपस्तंभ उपयोगी असतात.
आपल्या संपर्कात राहायला आवडेल.
मिलिटरी कमांडर कंबाईन्ड या बॅनर खाली आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांवरील प्रेझेंटेशन्स ई-बुक माध्यमातून प्रकाशित केलेली आहेत. त्यांतील नरवीर तानाजी मालुसरेंची सिंहगडावरील शौर्यगाथा यावर आधारित बॅनर्स प्रदर्शन आपल्याला वाचनार्थ पाठवू इच्छितो.
मन:पूर्वक आभारी आहोत. तूम्ही डिटेल्स पाठवा सर, mail/w’app 🤝🤝