Thursday, May 30, 2024
Homeबातम्याआयएमए पिं-चिं-भो : नवी कार्यकारिणी

आयएमए पिं-चिं-भो : नवी कार्यकारिणी

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या (आयएमए) पिंपरी- चिंचवड भोसरी- शाखेच्या अध्यक्षपदी डॉ माया भालेराव तर सचिवपदी डॉ सारिका लोणकर व तर खजिनदार म्हणून डॉ मनिषा डोइफोडे यांची नियुक्ती करण्यात आली.
चिंचवड येथे झालेल्या पदग्रहण सोहळ्यात या सर्वांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

यावेळी आयएमएचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ शिवकुमार उत्तुरे व आयएमए राज्याचे उपाध्यक्ष डॉ वैजयंती पटवर्धन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर विश्वस्त डॉ दिलीप कामत, डॉ. संजय देवधर, मावळते अध्यक्ष डॉ सुशील मुथियान, डॉ सुहास माटे, डॉ विजय सातव, डॉ प्रभाकर बुरूटे, डॉ माधव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील तब्बल ९०० डॉक्टर सभासद असलेली ही संघटना 10 वर्षापासून कार्यरत आहे.
वेगवेगळया विषयावर वैद्यकीय परिषद व कार्यशाळा आयोजन, अवयवदान, टीबी जनजागृती, महिला स्वास्थ्य उपक्रम, आओ गांव चले असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ भालेराव यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ वर्षा कुऱ्हाडे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सारिका लोणकर यांनी केले.

नवीन कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे-
डॉ माया भालेराव – (अध्यक्ष)
डॉ सारिका लोणकर-(सचिव)
डॉ मनिषा डोईफोडे -(खजिनदार)
डॉ सुधीर भालेराव- (नियोजित अध्यक्ष)
डॉ ललित कुमार धोका- (उपाध्यक्ष)
डॉ अनिरुद्ध टोणगावकर-
( उपाध्यक्ष )
डॉ सुमीत लाड- ( संपादक- स्पंदन )
डॉ ज्योती डेकाते- (महिला डॉक्टर प्रमुख)
डॉ सुहास लुंकड – (सहसचिव)
डॉ दीपाली टोणगावकर (सह खजिनदार)

— लेखन : बाबू डिसोझा कुमठेकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments