Wednesday, September 11, 2024
Homeसाहित्यउंबरठा

उंबरठा

ओलांडता उंबरठा
दिसे जग बाहेरचे
तिथे नसे कोणी नाते
नाही कोणीही हृदयाचे //१//

घरा बाहेर असतो
उंबरठा उभारला
नाती दृढ करण्याचे
आवाहन करायला //२//

साऱ्या घराचे अस्तित्व
उंबरठा ठेवतसे
अबाधित व्यवस्थित
लक्ष्मी वास करतसे //३//

सडा सारवण करु
पुजू या उंबरठ्यास
जपू संस्कृती आपली
करु नये दुरापास्त //४//

लक्ष्मणरेषाच जणू
असतो हा उंबरठा
जग कळे बाहेरचे
ओलांडता उंबरठा //५//

दुःख क्रोध सांभाळून
घेत असणारे व्यक्ती
असे उंबरठया आत
जसे त्यांची ही नियुक्ती //६//

उंबरठा देत आहे
आपणास ही जाणीव
मर्यादाची संस्कृतीची
नाही कसली उणीव //७//

उंबरठ्याच्या बाहेर
कधीही पाडूच नये
वाकडे पाऊल कोणी
धुळीस मिळू नये //८//

सारथीच बनलेला
उंबरठाच असतो
वास्तुरुपी या घराचा
स्वच्छंद आनंद देतो //९//

परवीन कौसर

— रचना : परवीन कौसर. बंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments