जरी आजूबाजूला लाख काटे
गुलाबाला मी जवळपास करू लागले
जरी वेदना च्या नव्या ओळखी
खोटे मुखवटे घाबरवू लागले
जरी समाजाने लाख बोल लावले
जीवनात मी पाऊले टाकू लागले
जरी आता आसवांना आवरू लागले
आनंद डोळ्यात पुन्हा पांघरू लागले
जरी वसंता तू दूर होतास
मोहर फुलांचा मी अनुभवु लागले.
जरी टाळत होते उन्हाचे घर
आता सावलीत मी वावरू लागले.
— रचना : पूर्णिमा शेंडे. मुंबई
— संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
Very nice, kavita
उन्हंहा तले,घर आहे, त्या घरात हवे सावली चा आशिर्वाद, चार भिंतींच्या आत,हवा आम्हाला
आसरा.. मोलाचं आहे ते घर सुखी, समाधान
लेकरं उदंड, झाली अशा या 🏠 🏠 घरात..