Wednesday, July 2, 2025
Homeकलाऑपरेशन "सिंदूर"

ऑपरेशन “सिंदूर”

पहलगाम वर झालेल्या हल्ल्याचा शेवटी आज पहाटे भारताने बदला घेतलाच. भेकड दहशतवाद्यांनी २६ भगिनींचा “सिंदूर” हिरावून घेतल्याने पहाटेच्या मोहिमेला देण्यात आलेले ऑपरेशन “सिंदूर” हे नाव अगदी समर्पक असेच आहे.

भारताने आज केलेल्या हल्ल्यांची दृश्ये आपण टिव्ही आणि मोबाईलवर पहात आहातच. पण एरव्ही व्यंगचित्रे काढून रसिकांना हसवत हसवत अंतर्मुख करणारे, आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारातील व्यंग चित्रकार श्री गणेश जोशी यांनी पळपुट्या दहशतवाद्यांचे अतिशय योग्य असे व्यंगचित्र काढले आहे.

अल्प परिचय :
ठाणे येथील गणेश जोशी यांचा जन्म १९६४ साली रायगड जिल्ह्यात झाला. त्यांची व्यंगचित्रे गेली ३९ वर्षे विविध वृत्तपत्रांमध्ये, दिवाळी अंकांमध्ये प्रसिध्द होत आली आहेत. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी मधे व्यंगचित्र रेखाटली आहेत. तर गुजराती, तामिळ, कन्नड, उर्दू इत्यादी भाषेत त्यांची व्यंगचित्र भाषांतरीत झाली आहेत.

श्री जोशी यांची अनेक ठिकाणी वैयक्तिक चित्र प्रदर्शने झाली आहेत.
स्व.पंतप्रधान सर्वश्री राजीव गांधी, व्ही पी सिंग, अटलबिहारी वाजपेयी, इंदरकुमार गुजराल तसेच जेष्ठ नेते शरद पवार, क्रिकेटपटू सुनील गावसस्कर, अभिनेते अमिताभ बच्चन आदि अनेक क्षेत्रातील मान्यवरांना त्यांनी त्यांची अर्कचित्रे भेट दिली आहेत.

माजी मुख्यमंत्री सर्वश्री मनोहर जोशी, मनोहर पर्रीकर, (गोवा) विलासरावजी देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धवजी ठाकरे, एकनाथ शिंदे, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदि अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनाची उद्घाटने झाली आहेत.

राजकारण, कला, क्रीडा, पर्यावरण जागृती, प्रदूषण, औद्योगिक सुरक्षा, अंधश्रध्दा निर्मूलन, मतदार जागृती, वाहतुक सुरक्षा आदि अनेक विषयावर त्यांची प्रदर्शने झाली आहेत.
शालेय, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी ‘हसत खेळत व्यंगचित्रे काढा‘ हा उपक्रम ते आयोजित करीत असतात.
अनेक दैनिकात, साप्ताहिकात त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. दुरदर्शनवर मुलाखती व व्यंगचित्र प्रात्यक्षिके प्रसारीत झाली आहेत.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४