ओढ मज माझ्या माहेराची
आईच्या आर्जवी डोळ्यांची
बाबांच्या भावुक प्रतिक्षेची
भावंडांच्या प्रेमळ सहवासाची
ओढ मज आजी आजोबांची
बोबड्या, खोडकर भाचरांची
शेजारील प्रेमळ काका काकूंची
बालपणीच्या सुह्रदयी मैत्रिणींची
राघू, मनी, मोत्या कुत्र्याची
ओढ मज गाईच्या गोठ्याची
अंगणातील निवारी खाटेची
थंडगार पाण्याच्या माठाची
ओढ मज परसातील बागेची
जाईजुई, शेवंती, मोगर्याची
लाल चुटूक, केशरी गुलाबाची
पिवळ्या धम्मक सूर्य फुलांची
ओढ मज कुंपणातील झाडांची
आवळा, फणस, केळी, आंब्याची,
जांभूळ, पपई, पेरु, सीताफळाची,
ताज्या हिरव्यागर्द पालेभाज्यांची
गावा बाहेरील गावदेवीचे मंदिर
कृष्णामाईचे संथ वाहणे सुंदर
डोंगरामागील सूर्यास्त मनोहर
बालपणी शाळेची वाटतसे हूरहूर
बंद फ्लॅटमध्ये धरवत नाही धीर
मनी दाटतसे विचारांचे काहूर
जाणे नाही होणार आता सत्वर
मनी राहिल बंद कुपीतले अत्तर
— रचना : डॉ.सौ.अनुपमा नरेश पाटील.
खरचं ओढ लागते….ती माहेरची…
आठवणी राहतात मागे ..
दिवस जाता पुढे……
कधी ही कुठल्याही
वैभवाची
सर न येई त्यास…अशी ही ओढ ती माहेरची..
मस्त कविता…छानच