३० जुलै हा दिवस आंतराष्ट्रीय मैत्रीदिन म्हणून साजरा करण्यात येतो.ह्या दिवशी अनेक संस्था विविध उपक्रम राबवतात.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे कर्जतपासून चाळीस किलोमीटरवर असलेल्या आंबिवली येथील
शंभर एकर घनदाट जंगल असलेल्या परीसरात ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण करून निसर्गाशी मैत्री साधली. तसेच या परिसरात असलेल्या लेण्यांना भेट दिली.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2024/07/20240731_153246-COLLAGE2-1024x1020.jpg)
वृक्षारोपण करण्यात आल्यावर सर्वांनी सहलीचा आनंद लुटताना पावसाची जराही पर्वा केली नाही. सुग्रास भोजनानंतर सर्व सभासदांनी कथा कथन, कविता वाचन, नकला इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम केले. रायगड भूषण ह.भ.प. सौ.योगिता गणेश थरपुडे यांच्या प्रवचनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संयोजकांनी सर्वांची जाण्यायेण्याची, सुग्रास भोजनाची उत्तम सोय केल्यामुळे सर्व सभासद खुश झाले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2021/07/IMG_20210731_103826-150x150.jpg)
— लेखन : दिलीप गडकरी. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
दिलीपजी, रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण केले त्याचे फोटोज आणि वृत्त निवेदन खूपच छान. तुमचे सर्वच उत्साही ज्येष्ठ नागरिकांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा 🙏💐