Sunday, March 23, 2025
Homeबातम्याकला महोत्सव : सहभागी व्हा !

कला महोत्सव : सहभागी व्हा !

पुणे येथील “आभाळाखालची शाळा” फाउंडेशनने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय मराठी कला महोत्सव आयोजित केला आहे.

जगभरातील प्रत्येक मराठी कलावंताला यात सहभागी होता येणार आहे.

गट क्र. १ : वय वर्ष ०५ ते १५.
गट क्र. २ :वय वर्ष १६ ते २५.
गट क्र. ३ :वय वर्ष २६ ते ४०.
गट क्र. ४ : वय ४१ वर्षापुढील सर्व मराठी कलावंत या गटात भाग घेऊ शकतात.

या कला महोत्सवात आपण पुढील 2 विभागात भाग घेऊ शकता
१) गायन
२) वादन
🔰 कलामहोत्सवातील विविध स्पर्धा 🔰
गायन:
१) मराठी गाणे
२) नाट्यगीत
३) भावगीत,
४) लोकगीत,
५) भक्तीगीत,
६) चित्रपट गीत,
७) अभंग,
८) पोवाडा वादन:
९) कोणतेही वाद्य वादन
१०) तबला, पेटी, सतार, सरोद, बासरी, पखवाज, ई .

🔰 नियम आणि अटी🔰

१) आपल्याला आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी चार मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा. व्हिडिओच्या सुरुवातीला आपले संपूर्ण नाव आपण कोणत्या शहरातून आहात आणि कोणत्या देशातून आहात याची माहिती सांगावी आणि मग व्हिडिओला सुरुवात करावी.

२) आपला चार मिनिटांचा व्हिडिओ तयार करून, तो प्रायव्हेट ठेवून त्याची लिंक गूगल फॉर्म मध्ये टाकावी.

✅ आपले नाव
✅ वय
✅ स्पर्धेचा विभाग
✅ देश व शहराचे नाव सांगायचे आहे. (आपला फोन नंबर लिहिताना देशाच्या फोन कोडसह लिहायचा आहे.)

३) काही मान्यवर मराठी कलाप्रेमी (विशेष समिती) हे या कार्यक्रमाचे अवलोकन आणि परीक्षण करतील आणि त्यानंतर निर्णय घोषित करतील.

४) स्पर्धेसाठी आपण पाठवलेले व्हिडिओ हे “आभाळाखाली शाळा” या you ट्यूब चॅनेल वर टाकण्यात येतील ज्यामुळे जगभरातील सर्व रसिकांना त्याचा आनंदही घेता येईल आणि ईतर स्पर्धकांना देखील आपले व्हिडिओ बघता येतील. ज्यांची साठी तयारी असेल त्यांनीच या स्पर्धेत भाग घ्यावा.

४) स्पर्धेत भाग घेण्यासाठी खालील गुगल फॉर्म वर आपली माहिती लवकरात लवकर भरावी.

५) कार्यक्रमाची तारीख आणि वेळ आपल्याला लवकरच कळवली जाईल.

सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख : 25 feb 2025.

Google Form Link: https://forms.gle/y6VN3j2U6AqYZEFG7

५) या कला महोत्सवात सुमारे ५५ देशांमधील मराठी कलावंत देखील सहभागी होणार आहेत हे विशेष.

६) तीन दिवस हा महोत्सव सुरू राहील. त्यासंबंधी वेळोवेळी आपल्याला WhatsApp वरून सूचना पाठवल्या जातील.

✅हि माहिती आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया हॅण्डल वरून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तसेच परदेशी मराठी बांधवांपर्यंत, कलाप्रेमीपर्यंत पोहचवावी.

✅ सर्व सहभागी आणि यशस्वी कलावंतांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

✅ या कला महोत्सवात जगभरातील मराठी व्यक्ती भाग घेऊ शकतील.
✅ आपल्या संपर्कातील असणाऱ्या परदेशातील तसेच महाराष्ट्रातील सर्व कलावंतांपर्यंत हि माहिती आपण पोहचवावी हि विनंती.
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. दिलीप पुराणिक, अध्यक्ष
आभाळाखालची शाळा फाउंडेशन, पुणे.
+917620921098

— टीम एन एस टी. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments