Friday, December 6, 2024
Homeसाहित्यकलियुगातील कर्ण

कलियुगातील कर्ण

नमस्कार मंडळी.
काही सामाजिक कार्य, उपक्रमांना जितकी प्रसिद्धी देता येईल, ती देण्याचा आपला प्रयत्न असतो. असेच एक महत्वाचे कार्य म्हणजे अवयवदान होय. या विषयावर आपण आजवर अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. आज मात्र वाचू या एक कविता…

नांदेड येथील अभिजित ढोके या तरुणाच्या अकाली निधनाचे हलाहल पचवून त्याच्या परिवाराने त्याचे अवयवदान करण्याचा धाडसी, लोकोपयोगी निर्णय घेतला आणि तसे ते केलेही.
अभिजित यांच्या परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन. या परिवाराच्या दुःखात न्युज स्टोरी टुडे परिवार सहभागी आहे. अभिजितच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
– संपादक

अभिजित नामे अखंड विजयी
नावा प्रमाणे झाली पूर्तता
कर्ण जणू कलियुगातला
गरजवंतांचे जणू होते कर्ता

नोकरी बँकेत होते व्यवहारी
विनम्र सेवेतून जपत नाते
रक्तदान असो आरोग्य शिबिर
सगळ्यांसाठी होते दाते

गोरगरिबांची होती जाण
सर्वांचा ठेवत होते मान
सदैव हसतमुख, हजरजबाबी
साऱ्यांच्या हृदयात असे स्थान

व्यवस्थापनात होता हातखंडा
आयोजन, नियोजन, सूत्रसंचालन
अडचणी सोडवून परिसरातली
जिंकत होते साऱ्यांचे मन

अवयवदानातून दिली स्फूर्ती,
कलियुगातील कर्ण अशी झाली पुर्ती
महाराष्ट्रातच काय,
जगात ढोके कुटुंबीयाची झाली कीर्ती

सर्व समाजात ठरले आदर्श
जणू जाहला परिस स्पर्श
पारंपारिक आहेर प्रथा बाजूला सारून
“दान पावलं” देऊन
केले स्वागत सहर्ष

— रचना : गणेश साळवी. इंदापूर – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. *🙏🏻🙏🏻🙏🏻 संवेदनशील समाज म्हणून आपण सर्वांनी अभिजीत बद्दल आणि ढोके कुटुंबाबद्दल दाखविलेले प्रेम,आपुलकी आणि आत्मियतेची भावना येणाऱ्या काळातील आव्हाने पेलण्याची शक्ती आम्हाला प्रदान करणार आहे…ढोके कुटुंबीय या आधाराचे आभार मानून या भावनांचा अनादर करणार नाहीत,तर कायम ऋणात राहून समाजकार्यात यापुढेही कार्यप्रवण राहू…आपण सदरील अवयव दानाच्या चळवळीला अजून वेग प्रदान कराल ही नम्र अपेक्षा🙏🏻🙏🏻🙏🏻*

  2. *🙏🏻🙏🏻🙏🏻 संवेदनशील समाज म्हणून आपण सर्वांनी अभिजीत बद्दल आणि ढोके कुटुंबाबद्दल दाखविलेले प्रेम,आपुलकी आणि आत्मियतेची भावना येणाऱ्या काळातील आव्हाने पेलण्याची शक्ती आम्हाला प्रदान करणार आहे…ढोके कुटुंबीय या आधाराचे आभार मानून या भावनांचा अनादर करणार नाहीत,तर कायम ऋणात राहून समाजकार्यात यापुढेही कार्यप्रवण राहू…🙏🏻🙏🏻🙏🏻*

  3. अवयवदान या स्तुत्य उपक्रमाला दिलेली प्रसिद्धी हे news Story today पोर्टलची सामाजिक बांधीलकी अधोरेखित करते.
    खरंतर एखाद्या कुटुंबातील सदस्याचं निधन हे त्या कुटुंबावर कोसळलेलं मोठं दु:ख असतं.अशावेळी,निधन झालेल्या देहाचे विधीवत दहन करणं हा पारंपरिक संकेत ठरून गेला आहे.
    मात्र अभिजीतच्या ऐन तारुण्यात जाण्यानं दु:खी कुटुंबानं त्याचं अवयवदान करण्याचा जो निर्णय घेतला तो निस्चित अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहे.
    या अनोख्या आणि समाजोपयोगी उपक्रमाचे कवितेतून गणेश साळवी यांनी केलेले शब्दांकन अर्थपूर्ण आणि भावपूर्ण.🙏🏻

  4. सामाजिक जाणीव ठेवून आपण योग्य त्या बातम्या लेख कविता समाज पटलावरती आणता यासाठी प्रथम आपल्या न्यूज स्टोरी टुडे संपादकांचे मनापासून आभार….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on अशी होती माझी आई !
राजेंद्र वाणी दहिसर मुंबई on “प्रतिभा”ला वय नसतं !
नलिनी कापरे on आरशात पाहू जरा …
सौ.मृदुलाराजे on आरशात पाहू जरा …
अजित महाडकर, ठाणे on माझी जडणघडण : २६
सौ.मृदुलाराजे on वाचक लिहितात…
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !
शारदा शेरकर on “प्रतिभा”ला वय नसतं !
प्रतिभा सराफ on “प्रतिभा”ला वय नसतं !