रोज असे उपक्रम
शोध घेत राहे कवी
नित्य वाचकांच्या मनी
गोष्ट हवी नव नवी
रोज तेच लिखाणाने
वाचक कंटाळतात
मसालेदार साहित्य
वाचनास ताटकळतात
नव काव्य निर्मितीसाठी
कवी मन सदा आसुसते
लावणी, प्रेमगीत, भारूडात
सद्भाव कवी मन जोपासते
झुळझुळणारा मदन वारा
जसा देतो मनास आनंद
तशी सुंदर काव्यमय रचना
भेटीत घडवते ब्रह्मानंद
अक्षरातून निघती मोती
सागराच्या सुरेल लाटा
काव्याचे सुर ताल शब्द
कवी का शोधेल पळवाटा ?
मायबोली ही मराठी भाषा
बाकदार असे तीचा बाणा
साज सोळा शृंगारांनी येई
रसिक होई ताजातवाना
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
वाह वाह… अप्रतिम