भाजतो तनुला
वैशाख वणवा
कहर सूर्याचा
ग्रीष्म ऋतू नवा -१-
नच भागे तृष्णा
होरपळ जीवा
कोरडे संचय
मृगजळ ठावा -२-
थंड हवे जरा
तलखी पाहिली
झळा चराचरा
धरेची काहिली -३-
वैशाख महिना
नकोसा वाटतो
कुणास साहेना
थंडीस बाटतो -४-
उष्मा जो वाढतो
चटके असह्य
आग तो ओकतो
सूर्य गोळा त्याज्य -५-
— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर. निगडी, पुणे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 986948480